JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / मुलांनी निकवर मारले रंगांचे फुगे; पाहा अंबानींच्या होळीत प्रियांकाची धम्माल

मुलांनी निकवर मारले रंगांचे फुगे; पाहा अंबानींच्या होळीत प्रियांकाची धम्माल

ईशा अंबानीनं होळी खेळण्यासाठी आपल्या फार्म हाऊसवर आमंत्रण दिलं होतं. प्रियांकानं देखील ते आमंत्रण स्विकारत खास पार्टीत हजेरी लावली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 29 मार्च: होळी हा देशातील सर्वाधिक लोकप्रिय सण आहे. (holi Celebrations) सर्वसामान्य लोकांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण रंगांची उधळण करुन या सणाचा आनंद घेतो. दरम्यान होळीच्या निमित्तानं सध्या सेलिब्रिटींचे रंगपंचमी खेळतानाचे व्हिडीओ सर्वत्र चर्चेत आहेत. मात्र यामध्ये अंबानी यांच्या घरी खेळली गेलेली होळी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे ही खास पार्टी चर्चेत आली ती अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) अन् तिचा पती निक जोनासमुळं. (Nick Jonas) त्यांनी अशी काही धम्माल होळी खेळली की सर्वजण चकितच झाले. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ खरं तर गेल्या वर्षीचा आहे. लग्न झाल्यानंतर प्रियांका पहिल्यांदाच आपल्या पतीसोबत भारतात परतली होती. त्यावेळी तिला ईशा अंबानीनं होळी खेळण्यासाठी आपल्या फार्म हाऊसवर आमंत्रण दिलं होतं. प्रियांकानं देखील ते आमंत्रण स्विकारत खास पार्टीत हजेरी लावली होती. या पार्टीत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आले होते. परंतु खऱ्या अर्थानं सर्वांचं लक्ष  वेधून घेतलं ते प्रियांकानं. तिनं आपल्या पतीसोबत धम्माल होळी खेळली.

संबंधित बातम्या

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये निक प्रियांकावर रंगांची उधळण करताना दिसत आहे. अक्षरश: बादल्या भरुन तो तिच्यावर पाणी ओतत आहे. अर्थात या होळी सेलिब्रेशनमध्ये इकोफ्रेंडली रंगांचा वापर करण्यात आला होता. व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. होळी**,** धूलिवंदनावर करोनाचे सावट यंदा होळी धूलिवंदनावर करोनाचे सावट आहे. करोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पाश्र्वाभूमीवर पालिके ने होळी आणि धूलिवंदन हा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई केली आहे. तसेच आखून दिलेल्या नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी पालिके च्या प्रत्येक विभाग कार्यालयांतर्गत पाच विशेष पथके  तयार करण्यात आली आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास प्रसंगी पोलिसांचीही मदत घेण्यात येणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या