JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘अशा मुलांना 15 मार्क अधिक द्या’; प्रशांत दामले यांची महाराष्ट्र सरकारला विनंती

‘अशा मुलांना 15 मार्क अधिक द्या’; प्रशांत दामले यांची महाराष्ट्र सरकारला विनंती

मराठी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी केलेलं कौतुक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 8 ऑगस्ट**:** टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं सुवर्ण पदक जिंकलं आहे. भारताला पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक प्रकारात एखाद मेडल मिळालं आहे. (Neeraj Chopra gold medal in Olympics) त्यामुळे नीरजच्या पराक्रमाच सर्वत्र कौतुक केलं जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून अगदी नामांकित सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र यामध्ये मराठी अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी केलेलं कौतुक सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. प्रशांत दामले यांनी आपले कवी मित्र अमेय वैशपायन यांनी नीरजच्या यशानंतर लिहिलेली खास कविता शेअर केली. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी नीरजवर कौतुकाचा वर्षाव केला. सोबतच महाराष्ट्रातील शाळांमधून खेळाडू घडवण्याची गरज असल्याची इच्छा व्यक्त केली. ‘किमान खेळात तरी राजकारण सोडा’; नीरज चोप्राला शुभेच्छा देणारे अशोक पंडित ट्रोल “वाजली वाजली धून आपली पहा झेपावत दूर दूर गेला भाला पहा अस्त्र जणू सुटले ते लक्ष त्याने गाठले सोनेरी पदकासी त्याने कवटाळले अभिमानास्पद कृती ही ऊर भरून राहिले आमचेही जन गण मन आज जगी गाजले”

‘शर्लिन-पूनम सोडून मला पकडलं’; गहना वशिष्ठचा मुंबई पोलिसांवर आरोप या कवितेच्या खाली त्यांनी “महाराष्ट्रातील आंतर शालेय स्पर्धेत पहिल्या आलेल्या मुलांना दत्तक घेऊन त्यांना प्रशिक्षण द्यायला हवं आणि त्यांच्या शाळेच्या अंतिम परीक्षेत त्यांना त्यासाठी किमान 15 गुण द्यायला हवेत तर त्यांचे पालक पण आनंदी आणि आश्वस्त राहतील.” अशी प्रतिक्रिया दिली आहे. नीरजने पहिली फेक 87.3 मीटर, दुसरी फेक 87.58 मीटर, तिसरी फेक 76.79 मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. चौथी आणि पाचवी फेक फाउल गेली. मात्र पहिल्या तीन फेकीत त्याची कामगिरी उत्तम ठरली. नीरजने सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व स्तरातून नीरजचं अभिनंदन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी ट्वीट करत नीरजचं अभिनंदन केलं आहे. नीरजसह 12 स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या