मुंबई 8 ऑगस्ट: राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे होत आहेत. (Raj Kundra Pornography case) त्यामुळे कोर्टाने कुंद्राच्या कोठडीत आणखी 14 दिवसांची वाढ केली आहे. दरम्यान या प्रकरणात अभिनेत्री गहना वशिष्ठ (Gehana Vasisth) हिचं देखील नाव घेतलं जात आहे. सध्या तिला जामिनावर सोडण्यात आलंय. परंतु ती वारंवार या प्रकरणी कुंद्राची बाजू घेत मुंबई पोलिसांवर निशाणा साधतेय. पूनम पांडे आणि शर्लिन चोप्रा देखील सॉफ्ट पॉर्न करत होते पण पोलीस केवळ माझ्या मागे लागले आहेत. (Sherlyn Chopra and Poonam Pandey) असं म्हणत तिने पुन्हा एकदा टीका केली आहे.
90च्या दशकातील करिश्माचे हे लुक्स आजच्या अभिनेत्रींनाही देतात टक्कर; आजही चालते हीच फॅशन
अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत गहना म्हणाली, “पूनम पांडे, शर्लिन चोप्रा सध्या आरोप करत आहेत. परंतु त्यांनी तर सॉफ्ट पॉर्नच्या माध्यमातून कोट्यवधी रूपये मिळवले. परंतु पोलीस केवळ माझ्याच मागे लागले आहेत. या अभिनेत्री गेली 20 वर्ष सॉफ्ट पॉर्नचा व्यवसाय करतायेत. त्यांचं उत्पन्न माझ्यापेक्षा तिप्पट आहे. परंतु पोलीस केवळ माझ्याच मागे लागले आहेत. त्यांना कोणी काहीच विचारत नाहिये. त्यांची देखील चौकशी करा. मग सत्य तुम्हाला कळेल.” पूनम व शर्लिन यांनी गहनाच्या आरोपांवर अद्याप कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
‘किमान खेळात तरी राजकारण सोडा’; नीरज चोप्राला शुभेच्छा देणारे अशोक पंडित ट्रोल
यापूर्वी काय म्हणाली होती शर्लिन चोप्रा?
मुंबई क्राईम ब्रांचकडे जबाब नोंदवल्यानंतर शर्लिनने इंडिया टुडेला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने चौकशीदरम्यान केलेल्या प्रश्नांवर भाष्य केलं. ती म्हणाली, “शिल्पा शेट्टीला माझे व्हिडीओ आवडतात असं सांगून माझी दिशाभूल करण्यात आली. राज माझा मेंटॉर होता. त्याने अनेक खोटी वचनं देऊन मला फसवलंय. जेव्हा तुम्ही शिल्पा शेट्टी सारख्या लोकांकडून प्रेरित होतात, तेव्हा तुम्हाला समजत नाही की काय बरोबर आहे आणि काय चूकीच आहे. जेव्हा असे व्हिडिओ बनवल्याबद्दल माझे कौतुक झाले, तेव्हा मला असे आणखी व्हिडीओ करण्याची प्रेरणा मिळाली.” मात्र शर्लिनचे हे आरोप शिल्पाने साफ फेटाळून लावले आहेत. तिला शर्लिनबद्दल काहीच माहित नाही असं स्पष्टीकरण तिने दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Porn video, Raj kundra, Web series