• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ‘किमान खेळात तरी राजकारण सोडा’; नीरज चोप्राला शुभेच्छा देणारे अशोक पंडित ट्रोल

‘किमान खेळात तरी राजकारण सोडा’; नीरज चोप्राला शुभेच्छा देणारे अशोक पंडित ट्रोल

राजीव गांधीचं नाव बदललं म्हणूनच भारताला गोल्ड मेडल मिळालं; अजब तर्क लावणारे अशोक पंडित ट्रोल

 • Share this:
  मुंबई 8 ऑगस्ट: टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानं सुवर्ण पदक जिंकलं आहे. भारताला पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेतील भालाफेक प्रकारात एखाद मेडल मिळालं आहे. (Neeraj Chopra gold medal in Olympics) त्यामुळे नीरजच्या पराक्रमाच सर्वत्र कौतुक केलं जात आहे. सर्वसामान्य लोकांपासून अगदी नामांकित सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. मात्र यामध्ये बॉलिवूड निर्माते अशोक पंडित (Ashoke Pandit) यांनी केलेलं ट्विट सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. “राजीव गांधी यांचं नाव बदलताच भारताला गोल्ड मेडल मिळालं” असं ते म्हणाले. मात्र यामुळे त्यांना जोरादार ट्रोल केलं जात आहे. मोदी सरकारने राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव बदलून ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलं. या पार्श्वभूमीवर अशोक पंडित यांनी नीरज चोप्राला शुभेच्छा देण्याच्या निमित्तानं काँग्रेसला टोला गलावला. “राजीव गांधी यांचं नाव बदलताच भारताला गोल्ड मेडल मिळालं” असं ते म्हणाले. मात्र या ट्विटमुळे त्यांना जोरदार ट्रोल केलं जात आहे. “सुवर्ण पदक पटकवल्याचा आनंद दिसत नाही तुमच्या चेहऱ्यावर, किमान खेळात तरी राजकारण सोडा, मोदींच्या काळात भारताने क्रिकेटमध्ये एकही आयसीसी ट्रॉफी पटकावलेली नाही, याबद्दल देखील काहीतरी बोला” अशा आशयाचे ट्विट करत अशोक पंडित यांना ट्रोल केलं जात आहे. Big Boss OTT: 'परम सुंदरी' मलायका बिग बॉसच्या घरात लावणार सुपरहॉट डान्सचा तडका, प्रेक्षकांची उत्कंठा वाढली ओल्या सांजवेळी..! आर्या आंबेकरच्या मधूर आवाजाने व्हाल मंत्रमुग्ध, हे रिमिक्स ऐकाच नीरजने पहिली फेक 87.3 मीटर, दुसरी फेक 87.58 मीटर, तिसरी फेक 76.79 मीटर लांब केली. पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये नीरज आघाडीवर होता. चौथी आणि पाचवी फेक फाउल गेली. मात्र पहिल्या तीन फेकीत त्याची कामगिरी उत्तम ठरली. नीरजने सुवर्ण पदक मिळवून स्पर्धेचा शेवट गोड केला आहे. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरजवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सर्व स्तरातून नीरजचं अभिनंदन केलं जात आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांनी ट्वीट करत नीरजचं अभिनंदन केलं आहे. नीरजसह 12 स्पर्धेक अंतिम फेरीत होते. नीरज चोप्रा (भारत), वेबर (जर्मनी), वडलेज (चेक रिपब्लिक), वेटर (जर्मनी), कॅटकवेट्स (बेलारूस), नदीम (पाकिस्तान), मियालेस्का (बेलारूस), मारडारे (मोल्डोवा), वेसली (चेक रिपब्लिक), नोवाक (रोमानिया), इटेलाटालो (फिनलँड), अॅम्ब (स्वीडन) हे स्पर्धक होते.
  Published by:Mandar Gurav
  First published: