मुंबई, 24 डिसेंबर: करण जोहरची (Karan Johar) ओळख बॉलिवूडचा उत्तम दिग्दर्शक अशी आहेच पण त्याचबरोबर त्याने अरेंज केलेल्या पार्ट्याही अतिशय प्रसिद्ध आहेत. अनेक मोठ-मोठे कलाकार त्याच्या पार्टीला जाण्यासाठी उत्सुक असतात. करण जोहरने नुकतीच एक धमाकेदार पार्टी आयोजित केली होती. पण ही पार्टी सेलिब्रिटींसाठी नसून स्टार किड्ससाठी (Party For Star Kids) होती. करणच्या पार्टीला चक्क शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) धाकटा मुलगा अबरामही (Abram) आला होता. अबरामचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. त्याच्यासोबत गौरी खानही त्या पार्टीला गेली होती. व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये अबरामचे फॅन्सी कपडे आणि त्याचा स्टायलिश मास्क चर्चेचा विषय ठरले आहेत. करण जोहर आणि त्याच्या धर्मा प्रोडक्शनसाठी हे वर्ष फारसं चांगलं गेलेलं नाही. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला. लॉकडाऊनमुळे त्याचं शूटिंगही बंद होतं. ड्रग्ज प्रकरणात त्याच्या एका पार्टीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.
मुंबईत अजूनही कोरोनाचं सावट कायम आहे. अशातच करण जोहरने दिलेल्या या स्टार किड्सच्या पार्टीमुळे नवे वाद उभे राहणार नाहीत ना याकडे त्याच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. करण जोहरने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.स्टुडंट ऑफ द इअर, कभी खुशी कभी गम, माय नेम इज खान, दिलवाले दुल्हनिया लें जाऐगें कल हो ना हो असे त्याचे अनेक चित्रपट गाजलेले आहेत. आता करणच्या चाहत्यांना त्याच्या ब्रह्मास्त्र आणि तख्त चित्रपटांचे वेध लागले आहेत.