JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / B'day Special: वाढदिवशी कंगनाचा डबल धमाका! Thalaivi च्या ट्रेलरनंतर Tejas चा नवा लुकही जारी

B'day Special: वाढदिवशी कंगनाचा डबल धमाका! Thalaivi च्या ट्रेलरनंतर Tejas चा नवा लुकही जारी

बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) आज आपला 34वा वाढदिवस (34th Birthday) साजरा करत आहे. आज कंगनाने वाढदिवशी डबल धमाका केला आहे. तिच्या ‘थलाइवी’ चित्रपटाचा ट्रेलर (Thalaivi trailer) प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर ‘तेजस’ या चित्रपटाचा न्यु लूकही जारी करण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 मार्च: बॉलिवूड क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) आज आपला 34वा वाढदिवस (34th Birthday) साजरा करत आहे. तिच्या वाढदिवशी आगामी चित्रपट ‘थलाइवी’चा ट्रेलर (Thalaivi trailer) प्रदर्शित झाला आहे. त्याचबरोबर कंगनाच्या दुसऱ्या आगामी चित्रपटाचा न्यु लूक देखील प्रदर्शित झाला आहे. रॉनी स्क्रूवालाच्या आरएसव्हीपी मूव्हीजनं तिच्या आगामी ‘तेजस’ चित्रपटाचा न्यु लूक (Tejas New Look) जारी केला आहे. याव्यतिरिक्त कंगनाला सोमवारी ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा (Best Actress) राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार (National Film award) मिळाला आहे. त्यामुळे यावर्षीचा वाढदिवस कंगनासाठी एकदम खास असणार आहे. आरएसव्हीपी मूव्हीजनं आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट करताना लिहिलं की, ‘प्रिय तेजस, तुझे पंख पसर आणि उत्तुंग भरारी घे, आज आणि नेहमी. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कंगना रणौत.’ या संदेशातसोबत त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये कंगना इंडियन एअरफोर्सच्या गणवेशात असून चेहऱ्यावर एक चमकदार हास्य आहे.

संबंधित बातम्या

आरएसव्हीपीनं अलीकडेच डिसेंबर महिन्यापासून वायुसेनेवर अधारित आपल्या ‘तेजस’ चित्रपटाच्या शुटींगला सुरुवात केली आहे. ‘तेजस’ या चित्रपटामध्ये एका महिला पायलटच्या  शूरपणाची आणि साहसाची कहाणी दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटात कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 2016 साली पहिल्यांदाच भारतीय लढाऊ विमान चालवण्यासाठी एका महिलेची नियुक्ती झाली होती. तिच्या जीवनावर अधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा ऐतिहासिक घटनेनं प्रेरित आहे. हे वाचा - B’day Special: बारावीत फेल झाल्यानंतर हट्टाने गाठली दिल्ली,आता आहे बॉलिवूड क्वीन या चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय वायुसेनेची कार्यशैली पाहायला मिळणार आहे. एक महिला म्हणून भारतीय वायूसेनेत करावा लागणारा संघर्षही या चित्रपटातून दाखवला जाणार आहे. हा चित्रपट देशातील तरुण वर्गासाठी प्रेरणा देणारं ठरेल असं मत चित्रपट निर्मात्यांनी व्यक्त केलं आहे. उरी: द सर्जिकल स्ट्राइकनंतर सर्वेश मेवारा यांनी लिहिलेला व दिग्दर्शित केलेला हा दुसरा चित्रपट असेल ज्यामध्ये सैन्य दलाच्या साहसाची कथा मांडली जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या