JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नव्या वर्षात निलेश साबळेकडून चाहत्यांना भन्नाट Surprise

नव्या वर्षात निलेश साबळेकडून चाहत्यांना भन्नाट Surprise

दिवसभराचं टेंशन दूर करत लोकांना हास्याचे डोस पाजणारा निलेश साबळे (Nilesh Sable) नव्या वर्षात नव्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 07 जानेवारी :  कसं काय मंडळी…हसताय ना?… हसायलाच पाहिजे… असं म्हणत अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करणारा माणूस म्हणजे निलेश साबळे (Nilesh Sable). निलेश साबळे टेलिव्हिजनसोबत आता इन्स्टाग्रामच्या माध्यमातूनही आपल्या भेटीला येणार आहे. गेली अनेक वर्ष निलेश मनोरंजन सृष्टीमध्ये आहे पण तो इन्स्टाग्रामसारख्या माध्यमापासून दूर होता. इन्स्टाग्रामवर निलेश साबळेच्या नावाने अनेक अकाऊंट्स आहेत मात्र आता ओरिजीनल निलेश साबळेचं ऑफिशयल इन्स्टाग्राम अकाऊंट तयार झालं आहे. श्रेया बुगडे (Shreya Bugde) आणि चला हवा येऊ द्याच्या सगळ्या टीमने एकत्र येत एक इन्स्टा लाइव्ह सुरू केलं होतं आणि हे लाइव्ह सुरू असताना ती म्हणाली, ‘मी निलेश साबळेच्या अकाऊंटवरुन करत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला निलेश साबळे सोशल मीडियावर येत आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्याशी संवाद साधायचा असेल तर आता थेट इन्स्टाग्रावरुन तो आपल्या भेटीला येणार आहे.’ चला हवा येऊ द्याच्या टीमनेही या लाइव्हमध्ये सहभागी होत काही गंमतीजमती सांगितल्या.

संबंधित बातम्या

निलेश साबळे उत्तम सूत्रसंचालक तर आहेच शिवाय अभिनय, लेखन, दिग्दर्शन अशा विविध कलांवरही त्याचं प्रभुत्व आहे. ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’ या शोमधून निलेश साबळेनी कलाविश्वात एण्ट्री घेतली. काही नाटकं आणि चित्रपटांमध्येही त्यानं काम केलं आहे. होम मिनिस्टर या गाजलेल्या मालिकेचं सूत्रसंचालनदेखील त्याने केलं होतं. सोशल मीडिया हे सेलिब्रिटींचं हक्काचं माध्यम आहे. जगातील कोणत्याही व्यक्तीशी बोलायचं असेल तर सोशल मीडियावरुन आपण काही क्षणात त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकतो. सोशल मीडियाची हीच ताकद जाणून अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या