मुंबई 7 जुलै**:** सहा दशकं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांचं निधन झालं आहे. ते 98 वर्षांचे होते. (Dilip Kumar passed away) हिंदूजा रुग्णालयात सकाळी 7.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देखील सोशल मीडियाद्वारे आपलं दु:ख व्यक्त केलं. “दिलीप कुमार एक महान कलावंत होते. त्यांच्याकडे अद्भूत अभिनय कौशल्य होतं. त्यांना पाहून मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटायचं. त्यांच्या निधनामुळे भारतीय मनोरंजनसृष्टीचं कधीही भरून न निघणारं नुकसान झालं आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना” अशा आशयाचं ट्विट करत नरेंद्र मोदी यांनी दिलीप कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. ‘रात्री 2 वाजता दिलिपजींचा फोन आला, अन्..’; सचिन पिळगांवकरांनी सांगितली खास आठवण
दिलिप कुमार यांनी इंग्रजांविरुद्ध दिलं होतं भाषण; गांधीवाले म्हणत टाकलं होतं तुरुंगात दिलीप कुमार यांचा जन्म 11 डिसेंबर 1922 ला पेशावरमध्ये झाला होता. त्यांनी 1944 मध्ये ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दित त्यांनी 65 चित्रपटांत काम केलं. दिलीपकुमार यांचा अभिनय असा होता की त्यांना अभिनयाचं विद्यापीठ म्हटलं जायचं. नया दौर, मुघल-ए-आझम, राम और शाम, गंगा-जमुना, कर्मा सौदागर असे एकापेक्षा एक चित्रपट त्यांनी दिले. अभिनेत्री सायरा बानोशी त्यांनी निकाह केला. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी सन्मान निशान-ए-इम्तियाझ देऊन गौरवण्यात आलं होतं.