JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर' मध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; वाचून म्हणाल क्या बात!

Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्रींच्या 'द वॅक्सीन वॉर' मध्ये झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता; वाचून म्हणाल क्या बात!

नुकतंच कांतारा तील मुख्य अभिनेत्री सप्तमी गौडा ‘द व्हॅक्सिन वॉर’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असा खुलासा विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केला होता. आता मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव देखील समोर आलं आहे.

जाहिरात

द वॅक्सीन वॉर

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 जानेवारी :  2022 मधला सर्वात बहुचर्चित चित्रपट ‘द कश्मीर फाईल्स चे निर्माते आणि दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आपली नवीन कलाकृती घेऊन सज्ज झाली आहेत. आगामी काळात त्यांचा ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यांच्या बहुप्रतिक्षित ‘द व्हॅक्सिन वॉर’ या चित्रपटाचे चित्रीकरण अखेर पूर्ण झाले असून आता चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा कोण साकारणार ते नाव अखेर समोर आलं आहे. नुकतंच कांतारा तील मुख्य अभिनेत्री सप्तमी गौडा ‘द व्हॅक्सिन वॉर’ मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार असा खुलासा विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केला होता. आता मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचं नाव देखील समोर आलं आहे. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते  नाना पाटेकर ‘द व्हॅक्सिन वॉर’मध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याबद्दल बोलताना विवेक रंजन अग्निहोत्री म्हणतात, ‘आय अॅम बुद्धा मध्ये आम्ही भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्यांसोबत काम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. द व्हॅक्सिन वॉर सिनेमासाठी मुख्य अभिनेता शक्तिशाली आणि  विश्वासार्ह असावा तसेच ज्याचा परफॉर्मन्स निर्विवाद आहे अशा व्यक्तीला कास्ट करण्याचा विचार करत असताना आम्हाला नाना पाटेकरांचं नाव सुचलं. नाना पाटेकर अशा अभिनेत्यांपैकी एक आहेत जे कोणत्याही भूमिकेत चमकतात.’ हेही वाचा - Video: ‘हे वागणं बरं नव्हं…’ चाहत्यासोबत केलेल्या ‘त्या’ कृतीनंतर नेटकऱ्यांनी रणबीरला सुनावलं विवेक पुढे म्हणाले की, “मला खूप आनंद झाला की पल्लवी आणि मी नाना पाटेकर यांची चित्रपटासाठी निवड केली. नाना पाटेकर आमच्या सर्वात महत्त्वाच्या, सर्वात प्रेरणादायी, प्रामाणिक आणि सत्यवादी चित्रपटात काम करत आहेत ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.’

संबंधित बातम्या

चित्रपटाची निर्माती आणि सह-अभिनेत्री पल्लवी जोशी म्हणाली, “नाना कदाचित चित्रपटसृष्टीतील अशा अभिनेत्यांपैकी आहेत ज्यांचे संपूर्ण लक्ष नेहमीच प्रकल्पाच्या चांगल्या कामावर असते. ते पटकथेत इतके गुंतून जातात की कधी कधी नाना आणि त्याने साकारलेल्या पात्रात फरक करणं कठीण होऊन बसतं. नानांची प्रत्येक भूमिका वेगळी आहे.  एक अभिनेत्री म्हणून मला अभिमान आहे की नाना पाटेकर आणि मी एकाच व्यवसायाचे आहोत. प्रत्येक शॉटमध्ये त्यांचे पात्र पडद्यावर उलगडताना पाहणे ही निव्वळ जादू होती."

कोरोना काळात भारतात बनवण्यात आलेली लस इतकी प्रभावी ठरली आहे की, देशाची लोकसंख्या १.४ अब्ज असूनही तेथील नागरिकांना कोरोनाचा फटका बसला नाही. त्याचवेळी चीन, ब्रिटन आणि इतर अनेक देश 2023 मध्ये कोरोनाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत, विवेक रंजन अग्निहोत्री आणि निर्माती पल्लवी जोशी हा चित्रपट 15 ऑगस्ट 2023 रोजी 11 भाषांमध्ये प्रदर्शित करण्यास तयार आहेत, ज्यामुळे तो आतापर्यंत चित्रित झालेल्या सर्वात आशादायक चित्रपटांपैकी एक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या