मुंबई, 23 जानेवारी : कोरोना थोडाफार ओसरल्यावर नव्या वर्षात सेलिब्रटीजच्या लग्नाची लाट आली आहे. अनेक तारे-तारका आपापल्या लगीनगाठी देखण्या सोहळ्यांमध्ये बांधत आहेत. यात आता अजून एका जोडीची भर पडली आहे. अभिज्ञा भावे, मानसी नाईक आणि आता आशुतोष कुलकर्णीनंतर दोन लोकप्रिय मराठी सेलिब्रिटी (Marathi celebrity) लग्नबंधनात अडकले आहेत. सिद्धार्थ आणि मिताली दोघांची हळद आणि संगीत सेरेमनी नुकताच झाला. या दोन्ही प्रसंगांचे फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. या फोटोजवर (photo) चाहते लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. त्यानंतर आता मेंदी सेरेमनीचे (ceremony) फोटोही या दोघांनी शेअर केले आहेत.
दोघांचेही फोटो अतिशय लक्षवेधी आहेत. सिद्धार्थनं शेअर केलेल्या फोटोमध्ये मिताली आणि तो अतिशय सुंदर खळाळून हसतो आहे. सोबतच एका फोटोत सिद्धार्थची आईसुद्धा त्याच्यासोबत दिसते आहे.
सिद्धार्थ आणि मितालीचे फोटो सगळ्याच सोशल मीडियाचं लक्ष वेधून घेत आहेत. या फोटोंना काहीच तासात 50 ते 60हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी दोघांना शुभेच्छा देणाऱ्या कमेंट्स या फोटोवर दिल्या आहेत. मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर हे मराठी इंडस्ट्रीमधील एक कूल कपल आहे. हे दोघे लग्नबंधनात कधी अडकतात याकडं सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं.
दोन वर्षांपूर्वी व्हॅलेंटाईन डेचा मुहूर्त साधत सिद्धार्थनं थेट इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर लगोलग त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात त्यानं मितालीला प्रपोज केलं होतं.