JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: शालिनी-अनिलचा नवा कट; जयदीपच्या जीवावर बेतणार?

VIDEO: शालिनी-अनिलचा नवा कट; जयदीपच्या जीवावर बेतणार?

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेला मोठी लोकप्रियता मिळत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई- ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ मालिकेत सतत नवनवीन ट्वीस्ट येत आहेत. मालिकेत गौरी आणि जयदीपच्या खुलणाऱ्या नात्यात दुरावा निर्माण करण्याचा काही लोकांचा प्रयत्न सुरु आहे. गौर आणि जयदीपला एकमेकानंवर असणाऱ्या प्रेमाची चाहूल लागली आहे. आणि हे प्रेम व्यक्त करता येऊ नये यासाठी त्यांच्याच कुटुंबातील व्यक्ती बाहेरच्या माणसांसोबत मिळून जीवघेणा कट रचत आहे. पाहूया येणाऱ्या भागामध्ये नेमकं काय घडणार आहे.

संबंधित बातम्या

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असत’ या मालिकेला मोठी लोकप्रियता मिळत आहे. गौरी आणि जयदीपची अनोखी केमेस्ट्री सगळ्यांनाचं भुरळ पाडत आहे. मालिकेत दोघांनामध्ये एक नवं नातं फुलत आहे. मात्र काही लोकांना हे बघवत नाही. आणि म्हणूनचं या दोघांमध्ये दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत. जयदीपची वहिनी शालिनी आणि अनिल हे दोघेही त्यांना दूर करण्याच्या प्र्यत्नानात आहेत. त्यामुळे हे दोघे मिळून दररोज नवीन कट रचत आहेत. (हे वाचा:  अमृता खानविलकरची हेल्दी रेसिपी; VIDEO पाहूनच तोंडाला सुटेल पाणी ) नुकताच मालिकेचा नवा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये जयदीपवर पुन्हा जीवघेणा आघात होणार असल्याचं दिसत आहे. मालिकेत माईनीं गौरीला जयदीपसाठी खीर बनवण्यास सांगितलं आहे. आणि ही गोष्ट जेव्हा शालिनीला समजते, तेव्हा ती अनिलला याब्द्द्दल कळवते. या दोघांनाही भीती असते की खीर खाऊन जयदीपच्या मनात गौरीबद्दल असणारी प्रेमाची भावना बाहेर येईल. आणि याचा त्यांना धोका निर्माण होईल. म्हणून ती अनिलला काहीतरी करण्यास सांगते. तेव्हा अनिल गौरी बनवत असलेल्या खीरमध्येचं विष घालतो. आत्ता ही खीर जयदीप खाणार का? आणि खाल्यास त्याच्या जीवाचं काही बर वाईट होईल का? याकडे दर्शकांचं लक्ष लागलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या