मुंबई, 30 जून- मनोरंजन सृष्टीतील कलाकार विविध माध्यामतून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहाण पसंत करतात. अनेक कलाकार सतत सोशल मीडियावर आपल्या दैनंदिन अपडेट देत असतात. इतकचं नव्हे तर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीसुद्धा चाहत्यांशी शेयर करत असतात. मराठमोळी अभिनेत्री (Actress) अमृता खानविलकरसुद्धा (Amruta Khanvilkar) अशाचं पद्धतीने आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकताच अमृता खानविलकरने आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेयर (Video) केला आहे. त्यामध्ये ती ब्रेकफास्ट तयार करताना दिसत आहे. यामध्ये तिने खास तिच्या स्टाईलमध्ये अंडा ओम्लेट केला आहे. तेही सॉस वेगैरेचा वापर करून अगदी वेस्टर्न पद्धतीने...
View this post on Instagram
अमृता खानविलकर सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. ती सतत आपल्या व्हिडीओ आणि फोटोंच्या माध्यामतून चाहत्यांच्या संपर्कात असते. अमृता आपल्या अनेक खाजगी गोष्टी चाहत्यांशी शेयर करत असते. नुकताच अमृताने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती चटकदार नाष्टा बनवताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये ती आपला आवडता एग ऑम्लेट बनवत आहे आणि तेही अगदी वेस्टर्न स्टाईलने सॉसचा वगेरे वापर करून. चाहत्यांना अमृताची ही कुकिंग स्टाईल खुपचं पसंत पडत आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत आहेत.
(हे वाचा:HBD: वजन कमी करत सर्वांनाचं दिला होता धक्का;अविका गोरचा अनोखा किस्सा )
अमृता खानविलकर सध्या आपल्या फिटनेसवर खुपचं लक्ष देत आहे. ती जास्तीत जास्त वेळ फिटनेससाठी देत आहे. सोशल मीडियावर सतत तिचे योगा आणि एक्सरसाईजचे व्हिडीओ व्हायरल होतं असतात. अमृता अलीकडे आधीपेक्षाही खुपचं फिट दिसूनसुद्धा येत आहे. तिच्या या व्हिडीओना मोठ्या प्रमाणात पसंत देखील केलं जातं. अमृता सध्या हिंदी मराठी दोन्ही भाषेच्या चित्रपटांमध्ये सक्रीय असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tips, Wellness