JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Majha Hoshil Na: आदित्यला होणार सईबद्दलच्या भावनांची जाणीव अन्...

Majha Hoshil Na: आदित्यला होणार सईबद्दलच्या भावनांची जाणीव अन्...

माझा होशील ना (Majha Hoshil Na) या मालिकेमध्ये आदित्यला सईबद्दलच्या प्रेमभावनेची जाणीव होणार आहे. आदित्य त्याच्या भावना सईला सांगणार पण…

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई,25नोव्हेंबर: माझा होशील ना? (Majha Hoshil Na) या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत लवकरच नवा ट्विस्ट येणार आहे. बंधूमामासमोर आदित्य त्याच्या प्रेमाची कबुली देणार आहे आणि बंधूमामाच्या आग्रहावरुन आदित्य सईला त्याच्या मनातल्या भावना सांगायला जाणार आहे. आता सईला त्याच्या मनातील भावना सांगणं आदित्यला शक्य होईल का? सई त्यावर काय प्रतिक्रिया देईल? त्या दोघांच्या नात्याची नवी सुरूवात होईल का? हे सगळं पाहायला प्रेक्षकांना फारच मजा येणार आहे. ब्रह्मे कुटुंबामध्ये आदित्य आणि त्याचे 4 मामा व आप्पा राहतात. एकाही बाईविना चालणारं घर आजपर्यंत प्रेक्षकांनी पाहिलं होतं. पण आता या कुटुंबामध्ये एका बाईची एन्ट्री होणार आहे. दादा मामाची लग्नाची बायको पुन्हा त्यांच्या आयुष्यात येणार आहे. सौ. सिंधू जगदिश ब्रह्मेंचं घरामध्ये आगमन होणार आहे. त्यामुळे आदित्यपासून लपवलेली ब्रह्मे कुटुंबाची अनेक गुपितं आदित्यसमोर उघड होणार आहेत.

माझा होशील ना या मालिकेमध्ये सिंधू ब्रह्मे म्हणून कोणती अभिनेत्री काम करणार? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. पण सिंधूच्या येण्यामुळे कुटुंबात वादळ येणार हे मात्र निश्चित. दादा मामा आपल्या बायकोला स्वीकारणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या