JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / ‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ का म्हणतात? गौरव मोरेनं सांगितलं थक्क करणारं कारण

‘फिल्टर पाड्याचा बच्चन’ का म्हणतात? गौरव मोरेनं सांगितलं थक्क करणारं कारण

अनेक प्रेक्षकांना प्रश्न असा पडलाय की त्याला फिल्टर पाड्याचा बच्चन असं का म्हणतात? (Filter Pada Powai) हे फिल्टर पाडा म्हणजे नेमकं आहे तरी काय? या प्रश्नाचं उत्तर स्वत: गौरवनं दिलं.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई 10 जून**:** महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasya Jatra) या विनोदी मालिकेतून नावारुपास आलेला गौरव मोरे (Gaurav More) आज एक लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. या मालिकेत गौरव मोरेच्या एण्ट्रीला एक विशिष्ट्य प्रकारचं म्युझिक वाजवलं जातं. अन् त्यानंतर फिल्टर पाड्याचा बच्चन अशी त्याची ओळख करुन दिली जाते. परंतु अनेक प्रेक्षकांना प्रश्न असा पडलाय की त्याला फिल्टर पाड्याचा बच्चन असं का म्हणतात? (Filter Pada Powai) हे फिल्टर पाडा म्हणजे नेमकं आहे तरी काय? या प्रश्नाचं उत्तर स्वत: गौरवनं दिलं. आज तकला दिलेल्या मुलाखतीत गौरवनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी त्यानं फिल्टर पाड्याचा बच्चन का म्हणतात? याचं कारणही सांगितलं. फिल्टर पाडा ही आरे कॉलनीमधील एक जागा आहे. सभोवताली जंगल आणि त्यामध्ये एक लहानशी वस्ती असं या जागेचं स्वरुप आहे. अन् या भागात गौरवचं बालपण गेलं. त्यामुळं त्याला फिल्टर पाड्याचा बच्चन असं म्हणतात. भविष्य सांगणाऱ्या भगरे गुरुजींची कन्या का झाली खलनायिका? रंग माझा वेगळा फेम श्वेताचा अनोखा प्रवास

‘गाणी रिमेक करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्या’; नव्या गाण्यांवर अभिजीत भट्टाचार्य संतापले अमिताभ बच्चन हे गौरवचे आवडते अभिनेते आहेत. त्याला बिग बींची हम चित्रपटातील स्टाईल मारायला खूप आवडते. अनेकदा एकांकिका स्पर्धेत त्यानं या प्रकारे एण्ट्री घेतली आहे. अन् त्याची ही एण्ट्रीची शैली हास्य जत्रेच्या लेखकांना प्रचंड आवडली. त्यामुळं त्याला त्याच शैलीत त्यांनी एण्ट्री मारण्यास सांगितली. अन् आज तो फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून लोकप्रिय झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या