मुंबई 10 जून**:** बॉलिवूडमधील रिमेक गाण्याचं प्रमाण सध्या कमालिचं वाढलं आहे. (Bollywood remake songs) 80-90च्या दशकातील सुपरहिट गाणी ऑटोट्यूनच्या मदतीनं सध्या रिमेक केली जात आहेत. बॉलिवूडमधील या रिमेक संस्कृतीवर प्रसिद्ध गायक अभिजीत भट्टाचार्य (Abhijeet Bhattacharya) यांनी संताप व्यक्त केला आहे. रिमेक करणाऱ्या या लोकांना भर चौकात फाशी द्या असं ते म्हणाले. शिवाय मेल्यानंतर सहा महिने त्यांना फासावरच लटकवून ठेवा असंही ते म्हणाले. बॉलिवूड स्पायला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत यांनी बॉलिवूडमधील सद्य परिस्थितीवर भाष्य केलं. ते म्हणाले, “एक काळ होता जेव्हा संगीतकार एखाद्या गाण्यावर तासंतास मेहनत घ्यायचे. त्या गाण्याची चाल कशी असेल? त्यात कुठल्या वाद्यांचा वापर केला जायला हवा यावर डिबेट करायचे. लेखक, गायक आणि संगीतकार यांच्या मिटिंग्स व्हायच्या. त्यामुळं ती गाणी आजही रिकांना हवीहवीशी वाटतात. कारण ते गाणं निर्माण केलं जायचं. परंतु आज केवळ कंप्युटर्सवर गाण्यांचं प्रोडक्शन केलं जातं. निर्लज्जासारखे मी मंडळी स्वत:ला संगीतकार म्हणतात. खरंच संगीतकार आहात तर दुसऱ्यांची गाणी का चोरता स्वत:ची निर्माण करा. पण नाही यांना ते जमत नाही त्यामुळं उगाच योयो म्हणत गाण्यांना रिमेक करतात. अशा रिमेक करणाऱ्यांना भर चौकात फाशी द्यायला हवी. कारण ते संगीतसृष्टीतील त्या महान संगीतकारांचा अपमान करत आहेत. त्यांची गाणी स्वत;च्या नावावर खपवत आहेत.” ‘हे लोक कुत्र्यासारखे भुंकतात अन् ऑटोट्यून करतात’; अभिजित भट्टाचार्य संतापले
बॉलिवूड गाण्यांवर रोमान्स करणं पोलिसांना पडलं भारी; DCP ने दिली बजावली नोटीस यापुढे ते म्हणाले, “आमच्या पिढीच्या गायकांना आज कामच मिळत नाही. कारण आम्हाला त्यांच्यासारखं गाणं गाता येत नाही. आज माझा आवाज माझ्या पिकवर आहे परंतु तरी देखील अशा प्रकारचं गाणं मी गाऊ शकेन असं वाटत नाही. किंबहूना अशा फसवेगीरीपासून मी दूर आहे याचंच समादान वाटतं. ही बॉलिवूड कलाकार लोकांचा फसवत आहेत.” असं म्हणत अभिजीत यांनी आपला राग व्यक्त केला.

)







