मुंबई, 28 एप्रिल : दिवंगत अभिनेता इरफान खानने (Irrfan Khan) मागील वर्षी 29 एप्रिलला जगाचा निरोप घेतला. इरफानच्या निधनाला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्याच्या निधनाच्या वर्षभरानंतर त्याचा मुलगा बाबिल खानने (Babil Khan) त्याच्या मृत्यूच्याआधीच्या काही गोष्टींचा खुलासा केला आहे. इरफानला त्याच्या मृत्यूची चाहुल लागली होती, असं बाबिलने एका मुलाखतीत सांगितलं. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत इरफानचा मुलगा बाबिल आणि पत्नी सुतापा (Sutapa sikdar) यांनी इरफानविषयी काही गोष्टी सांगितल्या आहेत. बाबिल इरफानच्या मृत्यूआधी दोन दिवस इरफानला भेटायला हॉस्पिटलमध्ये गेला होता. तेव्हा बाबिल आणि इरफानचं शेवटचं बोलणं झालं होत. तेव्हा इरफान त्याची शुद्ध हरपत होता, असं बाबिलने सांगितलं
इरफानने बाबिलकडे पाहून “मी आता जाणार आहे” असं म्हटलं. तेव्हा बाबिलने “नाही तुम्ही जाणार नाही” असं म्हटलं. त्यानंतर इरफान स्मितहास्य करत झोपला हे वाचा - ‘…आणि मी त्याच्या कानशिलात लगावली’; फातिमासोबत झाली होती छेडछाड पत्नी सुतापाने ही इरफानच्या काही चांगल्या गोष्टी सांगितल्या, “त्याची चांगली गोष्ट म्हणजे तो कधीच खोटं बोलत नव्हता, मग भले तो तुमच्यावर रागावला असेल किंवा प्रेमात असेल. महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा तो प्रेमात असतो तेव्हा जोपर्यंत त्याला आय लव्ह यू हे खरंच बोलावं वाटत नाही तोपर्यंत तो बोलायचा नाही”, असं सुतापा म्हणाली. इरफानविषयी बोलताना सुतापा आणि बाबिल हे फार भावुक झाले. इरफानची एक्झिट आमच्या आयुष्यात पोकळी निर्माण करुन गेल्याचं बाबिल म्हणाला. वडिलांप्रमाणेच तो एक चांगला मित्रही होता, असं बाबिलने सांगितलं. हे वाचा - ‘डान्स दिवाने 3’ मध्ये माधुरी दीक्षितच्या जागी सोनू सूदची एन्ट्री मागील वर्षी एप्रिल महिन्यात इरफानचं निधन झालं होतं. अनेक दिवस तो कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होता. ‘अंग्रेजी मीडियम’ हा त्याचा शेवटचा चित्रपट होता. इरफानचा मुलगा बाबिल हा नेटफ्लिक्सचा चित्रपट ‘काला’ (Qala) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहेत. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला होता.