मुंबई, 28 एप्रिल- बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’(Bollywood Dhak-Dhak Girl) माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) आजही तितकीच तरुण आणि सुंदर आहे. आजही माधुरीचे लाखो चाहते आहेत. माधुरीच्या अभिनयासोबतचं तिच्या डान्सने सुद्धा चाहत्यांना वेड लावलं आहे. तिच्या अदाकारीने चाहत्यांच्या मनात एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. सध्या माधुरी दीक्षित ‘डान्स दिवाने 3’ (Dance Diwane 3) या कार्यक्रमामध्ये परीक्षकाची भूमिका साकारत आहे. माधुरीच्या असण्याने ये कार्यक्रमाच्या टीआरपीत सुद्धा वाढ झाली आहे. मात्र येत्या काही दिवसांसाठी माधुरी या कार्यक्रमामधून गायब असणार आहे. त्यामुळे चाहते थोडे दुखी आहेत.
View this post on Instagram
डान्सिंग रिएलिटी शो ‘डान्स दिवाने 3’ सध्या खुपचं चर्चेत आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. काहीदिवसांपूर्वी सेटवर एकाच वेळी 18 जणांना कोरोनाची लागण झाल्याने हाहाकार माजला होता. त्यांनतर कार्यक्रमातील दुसरा परीक्षक धर्मेश येलांडे यालासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. धर्मेश नंतर होस्ट राघव जुयाल यालासुद्धा कोरोनाची लागण झाली होती. आत्ता अशी माहिती समोर येत आहे की, येत्या चार भागांमध्ये माधुरी दीक्षित सुद्धा कार्यक्रमात दिसणार नाही. माधुरीने हा कार्यक्रम सोडलेला नाही किंवा तिला रिप्लेसही केलेलं नाही. मात्र ती चार आठवड्यांसाठी नसणार आहे. पुढच्या एपिसोडची शुटींग बेंगलोरमध्ये सुरु आहे.
(हे वाचा: इमरान हाशमीच्या Video नं केला विक्रम; काही दिवसात मिळवले 5 कोटी व्ह्यूज )
सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. त्यामुळे मुंबईमधील सर्व शुटींग बंद ठेवण्यात आल्या आहेत. आणि म्हणूनचं काही दिवस डान्स दिवानेचं शूट बेंगलोरमध्ये पार पडणार आहे. मात्र माधुरी दीक्षितने बेंगलोरला जाण्यास नकार दिला आहे. त्यामुळे येत्या काही भागांमध्ये ती दिसणार नाही. तसेच काही भागांसाठी माधुरीच्या जागी अभिनेता सोनू सूदची वर्णी लागली आहे. यामध्ये नोरा फतेहीसुद्धा परीक्षकाच्या भूमिकेत दिसून येत आहे.
माधुरी दीक्षितने नुकताच कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस घेतला आहे. असं म्हटलं जातं आहे, की याचं कारणामुळे माधुरी मुंबईहून बाहेर जाण्यास नकार देत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Coronavirus, Madhuri dixit, Marathi entertainment