मुंबई 28 एप्रिल: अनेक महिलांना रोड रोमियोंचा सामना करावा लागतोच काहीजनी तिथेच सडेतोड उत्तर देतात तर काही गप्प ही राहतात. पण असाच धक्कादायक अनुभव बॉलिवूड अभिनेत्री फातिमा सना शेख (Fatima Sana Shaikh) ला ही आला होता. फातिमाचा नुकताच ‘अजिब दास्तान’ (Ajeeb Dastaan) हा नेटफ्लिक्सचा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
एका वेबसाईटला फातिमाने दिलेल्या मुलाखतीत तिने हा धक्कदायक अनुभव सांगितला आहे. एका रोड रोडरोमियोनं तिला छेडण्याचा प्रयत्न केला होता व त्यानंतर त्याने तिला जोरदार बुक्की दिली होती ज्यामुळे फातिमाला काहीचं दिसेनासं झालं होतं. पण फातिमाने त्याचा सामना केला.
फातिमा म्हणाली, “मी माझ्या नेहमीच्या रस्त्याने जीम वरुन घरी जात होते, तेव्हा मी पाहिलं एक माणूस एकटक माझ्याकडेच पाहत आहे. मी त्याच्या वर ओरडले आणि विचारलं माझ्याडे असं का पाहत आहेस? तर त्याने माझी इच्छा असं म्हटलं. मी त्याला विचारलं कानाखाली खायची आहे का? तर त्याने ‘हो’ असं उत्तर दिलं.”
कॉलसेंटरमध्ये काम करणारी समंथा कशी झाली कोट्यवधींची मालकीण?
या सगळ्या संभाषणानंतर त्याने त्या माणसाने फातिमाच्या चेहऱ्याला हात लावण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर फातिमाने त्याला कानशिलात लगावली.
View this post on Instagram
पुढे ती म्हणाली, “मी त्याच्या कानशिलात लगावली, त्याने मला जोरदार बुक्की दिली. माझ्यासमोर पुर्णपणे अंधार झाला. मी लगेच माझ्या बाबांना बोलवलं, आणि घडलेला सगळा प्रकार सांगितला. ते आणखी एक दोन माणसं घेऊन आले. तुम्हाला माहितच आहे वडील कसे असतात. तो माणूस रस्त्यावर धावू लागला, माझे बाबा, माझा भाऊ आणि त्यांचे मित्र या सगळ्यांनी मिळून त्याला पकडलं आणि कोणी माझ्या मुलीला हात लावला असं विचारु लागले.”
‘दंगल’ (Dangal) चित्रपटातून फातिमाला बॉलिवूड मध्ये खरी ओळख मिळाली. तर त्याआधी तिने काही चित्रपटांत बालकलाकर म्हणूनही काम केलं होत. काही दिवसांपूर्वीच फातिमा कोरोना पॉझिटिव्ह आली होती. तर आता ती बरी झाली आहे. तर नुकतेच तिने तिच्या सोशल मीडियावरून ब्रेक घेण्याचं ठरवलं आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर पोस्ट करत तिने हे सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Actress, Bollywood actress, Entertainment, Web series