JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / निक्की तांबोळीने पुन्हा वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, लाल रंगाच्या ड्रेसमधील HOT PHOTO व्हायरल

निक्की तांबोळीने पुन्हा वाढवलं सोशल मीडियाचं तापमान, लाल रंगाच्या ड्रेसमधील HOT PHOTO व्हायरल

दक्षिण आफ्रिकाची (South Africa) राजधानी असणाऱ्या ‘केपटाऊन’(Kep Town) मध्ये ‘खतरों के खिलाडी 11’ (Khatron ke khiladi 11) चं शुटींग चालू आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 मे : दक्षिण आफ्रिकेची (South Africa) राजधानी असणाऱ्या ‘केपटाऊन’(Kep Town) मध्ये ‘खतरों के खिलाडी 11’ (Khatron ke khiladi 11) चं शुटींग चालू आहे. ‘बिग बॉस 14’ फेम निक्की तांबोळी सुद्धा (Nikki Tamboli) या शोची स्पर्धक आहे. निक्की सतत केपटाऊनमधून आपले हॉट आणि बोल्ड फोटो शेयर करत असते. नुकताच निक्कीने रेड कलरच्या ड्रेसमधील हॉट फोटो सोशल मीडियावर शेयर केले आहेत. या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ‘बिग बॉस 14’ नंतर निक्की तांबोळीची लोकप्रियता अफाट वाढली आहे. त्यामुळे तिला लगेच ‘खातरों के खिलाडी’ मध्ये झळकण्याची संधी मिळाली आहे. सध्या सर्व स्पर्धक केपटाऊनमध्ये आहेत. सर्व स्पर्धक सतत तेथील अपडेट चाहत्यांना देत असतात. निक्की तांबोळीसुद्धा आपल्या फोटों आणि व्हिडीओच्या माध्यामतून चाहत्यांच्या संपर्कात आहे.

संबंधित बातम्या

निक्कीने नुकतेच आपल्या इन्स्टाग्रामवर रेड कलरच्या ड्रेसमध्ये काही फोटो शेयर केले आहेत. ऑफ शोल्डर असणाऱ्या या ड्रेसमध्ये निक्की खुपचं हॉट दिसत आहे. चाहत्यांना निक्कीचा हा अंदाज चांगलाच पसंत पडत आहे. निक्कीने फोटो शेयर करत ‘Miracles are proud creature’ असं कॅप्शन सुद्धा दिलं आहे. निक्कीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स येत आहेत. (हे वाचा: VIDEO: ‘बिग बॉस 14’ची विजेती रुबिना दिलैकने सांगितला Covid रिकव्हरीचा प्रवास   ) कमेंट् करत एका युजरने ‘हॉट’ असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजरने निक्कीला ‘हुस्न की मल्लिका’ असं संबोधलं आहे. चाहत्यांबरोबरचं अनेक कलाकारांनी सुद्धा निक्कीला कमेंट केल्या आहेत. (हे वाचा: HBD : सोनाली-कुणालचं शुभमंगल कधी? पाहा सोनालीला कसा भेटला साथीदार   ) यापूर्वी सुद्धा निक्कीने केपटाऊनमध्ये हॉट बिकिनी फोटोशूट केल होतं. या फोटोंना सुद्धा खूपच पसंती मिळाली होती. काही लोकांनी निक्कीला ट्रोलसुद्धा केल होतं. काही दिवसांपूर्वीच निक्कीच्या लहान भावाचं निधन झालं आहे. त्यामुळे निक्की असं एन्जॉय कसं करू शकते, असं म्हणत काही युजर्सने तिला ट्रोल केलं होतं. यावर निक्कीने उत्तर देत ट्रोलर्सनां चांगलंचं सुनावलंही होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या