मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'बिग बॉस 14'ची विजेती रुबिना दिलैकने सांगितला Covid रिकव्हरीचा प्रवास, पाहा VIDEO

'बिग बॉस 14'ची विजेती रुबिना दिलैकने सांगितला Covid रिकव्हरीचा प्रवास, पाहा VIDEO

 ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14 Winner) ची विजेती रुबिना दिलैकला(Rubina Dilaik)  काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14 Winner) ची विजेती रुबिना दिलैकला(Rubina Dilaik) काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.

‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14 Winner) ची विजेती रुबिना दिलैकला(Rubina Dilaik) काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 18 मे-  छोट्या पडद्यावरील (Tv Actress) प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 14’ (Bigg Boss 14 Winner) ची विजेती रुबिना दिलैकला ress(Rubina Dilaik)  काही दिवसांपूर्वीच कोरोनाची लागण झाली होती. रुबिनाने स्वतः सोशल मीडियावरून ही माहिती दिली होती. ती सध्या आपल्या कुटुंबांसोबत हिमाचल प्रदेशमध्ये आहे. तर तिचा पती अभिनव शुक्ला केपटाऊनमध्ये ‘खातारों के खिलाडी 11’ च्या शुटींगमध्ये बिझी आहे.

" isDesktop="true" id="552432" >

नुकताच रुबिनाने आपला एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने कोरोनाची लागण झाल्यापासून ते त्यावर मात करेपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. बिग बॉस विजेती रुबिनाला महिन्याच्या सुरुवातीलाच कोरोनाची लागण झाली होती. रुबिनाने युट्यूबवर आपला एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिने आपल्या कुटुंबांचे आभार मानले आहेत आणि हा सर्व कालावधी आठवून ती भावुकसुद्धा झाली आहे.

(हे वाचा: Happy Birthday: आधी पेंटर, मग सिंगर आणि आता अभिनेता; वाचा अली जफरचा प्रवास)

रुबिनाला यामध्ये रॅपिड अँटीजन टेस्टपासून ते कोव्हिड टेस्ट करेपर्यंत करताना पाहाता येत. मात्र रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर रुबिना आनंदी झालेलंसुद्धा पाहायला मिळतं. कारण तिला आनंद होता की एका महिन्यांनंतर प्लाझ्मा डोनेट करता येईल. त्याचबरोबर ती सांगते की मी पुढच्या 17 दिवस आयसोलेशनमध्ये राहणार आहे. या पूर्ण कोरोनाच्या प्रवासामध्ये रुबिनाला भावुक झालेलं सुद्धा पाहायला मिळत.

(हे वाचा:Happy Birthday: वॉचमन ते अभिनेता, वाचा नवाजुद्दीन सिद्दिकीचा थक्क करणारा प्रवास  )

महिन्याच्या सुरुवातीला रुबिनाने आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं जाहीर केल होतं. रुबिनानं म्हटलं आहे, की या काळात तिने स्वतःची काळजी घेतली. आणि आपल्या कुटुंबाला स्वतः पासून अगदी दूर ठेवलं होतं. अशा पद्धतीने अगदी धाडसाने रुबिनाने कोरोनाशी यशस्वी लढा दिला आहे. रुबिनाचं चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक देखील होत आहे.

First published:

Tags: Big boss 14 winner, Entertainment, Rubina dilaik, Tv actress