मुंबई, 14 सप्टेंबर: कौन बनेगा करोडपतीमध्ये फक्त हॉटसीटवर बसलेल्या व्यक्तीच्या सामान्य ज्ञानाची परीक्षा होते असं नाही, तर माणुसकीच्या अनेक छटा या निमित्ताने अमिताभ बच्चन आपल्या खास शैलीत उलगडतात. प्रत्येक स्पर्धकाची वेगळी कथा प्रेक्षकासमोर येत असते. मंगळवारी Big B च्या समोर होता पुण्याचा आकाश वाघमारे. आकाशविषयी एक छोटी फिल्म सुरुवातीला दाखवण्यात आली आणि त्यातून कोरोना काळात आकाशच्या कुटुंबीयांच्या वाट्याला आलेलं पुण्याचं एक निर्दय वास्तव समोर आलं. आकाश आणि त्याचं कुटुंब पुण्यात एका अंडरकन्स्ट्रक्शन इमारतीत राहातं. अमिताभ बच्चन यांनी ते अशा ठिकाणी का राहतात, असं विचारल्यावर आकाशच्या उत्तरातून माणुसकीचं एक विचित्र रूप समोर आलं आणि पुण्यातलं निर्दय वास्तवही. वास्तविक त्यांच्यावर ही वेळ आली कोरोना काळातच. Coronavirus च्या पहिल्या लाटेतही पुण्यात मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्ण सापडत होते. शहरात या नव्या विषाणूची प्रचंड दहशत होती. सोशल डिस्टन्सिंग नव्याने समजलेला तो काळ. आकाश आपल्या परिवारासह तेव्हा एका चांगल्या सोसायटीत राहायचे. आकाश यांचे वडील तिथे 2008 पासून सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करत होते.
Manike Mage Hithe: ‘कोलावेरी’पेक्षाही जबरदस्त हिट! एव्हाना ऐकलंच असेल हे गाणं
आकाशच्या वडिलांना फुफ्फुसांचा आजार आहे आणि त्यांच्या फुफ्फुसांची क्षमता 50 टक्क्यांनी कमी झाली होती. अशा वेळी कोरोना संसर्गाचा सर्वाधिक धोका त्यांना होता. त्यामुळे सोसायटीच्या दोन कॉमन वॉशरूम्सपैकी एक फक्त त्यांच्या वैयक्तिक वापरासाठी ठेवायला परवानगी द्यावी, अशी विनंती त्यांनी सोसायटीला केली. पण पुण्यातल्या सोसायटीने ती अमान्य केली. नाईलाजाने वडिलांना ती नोकरी सोडावी लागली आणि सोसायटीतलं घरही. आकाशला स्पर्धा परीक्षेत यश मिळवून प्रशासकीय सेवेमध्ये दाखल व्हायचं स्वप्न आहे. पण तो अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत अभ्यास करत आहे. तो राहात असलेल्या घरात वीजसुद्धा नाही. मेणबत्तीच्या प्रकाशात आकाश अभ्यास करतो. पूर्ण वेळ अभ्यासही शक्य नाही. त्यामुळे तो फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. घरोघरी जेवण-खाण पोहोचवण्याचं काम करून तो रात्री मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास करतो.
kBC 13
KBC मध्ये आलो तर life changing experience ठरेल, असं आकाशने सुरुवातीला केलेल्या VIDEO मध्ये म्हटलं होतं. पुण्याच्या आकाशने अखेर हॉट सीटवर प्रवेश मिळवलाच. कौन बनेगा करोडपतीचा हा एपिसोड 14 सप्टेंबरला टेलिकास्ट झाला. अमिताभ बच्चन यांनी आकाशला फूड डिलिव्हरी बॉयसारखं पार्सल दिलं. ‘बच्चन साहेब आपल्यासाठी फूड डिलिव्हरी करताना पाहून धन्य झालो’, असं म्हणत आकाश भावुक झाला.