मराठी बातम्या /बातम्या /Viral /Manike Mage Hithe: 'कोलावेरी'पेक्षाही जबरदस्त हिट! एव्हाना ऐकलंच असेल हे गाणं, अर्थ कळला का?

Manike Mage Hithe: 'कोलावेरी'पेक्षाही जबरदस्त हिट! एव्हाना ऐकलंच असेल हे गाणं, अर्थ कळला का?

अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षितपासून प्रिया बापटपर्यंत अनेक सेलेब्रिटींना या गाण्यावर Reel बनवण्याचा मोह आवरलेला नाहीये. instagram वर असाल तर आतापर्यंत शेकडो वेळा हे गाणं ऐकलं असेल पण शब्द आणि अर्थ मात्र नक्कीच कळला नसेल. सर्वात भारी viral song कुठल्या भाषेत आहे माहितीये का?

अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षितपासून प्रिया बापटपर्यंत अनेक सेलेब्रिटींना या गाण्यावर Reel बनवण्याचा मोह आवरलेला नाहीये. instagram वर असाल तर आतापर्यंत शेकडो वेळा हे गाणं ऐकलं असेल पण शब्द आणि अर्थ मात्र नक्कीच कळला नसेल. सर्वात भारी viral song कुठल्या भाषेत आहे माहितीये का?

अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षितपासून प्रिया बापटपर्यंत अनेक सेलेब्रिटींना या गाण्यावर Reel बनवण्याचा मोह आवरलेला नाहीये. instagram वर असाल तर आतापर्यंत शेकडो वेळा हे गाणं ऐकलं असेल पण शब्द आणि अर्थ मात्र नक्कीच कळला नसेल. सर्वात भारी viral song कुठल्या भाषेत आहे माहितीये का?

पुढे वाचा ...

  मुंबई, 14 सप्टेंबर: सोशल मीडियाच्या (Social Media viral song) जमान्यात कोणाचं कधी काय viral होईल सांगता येत नाही. कोलावेरी डी (Kolaveri di) गाण्याने सोशल मीडिया जगतात इतिहास घडवला. गँगनम स्टाइलने  (gangnam style) तर जगाला तालावर नाचवलं होतं. चांगल्या संगीताला भाषेचं बंधन नसतं हे सिद्ध करणारं एक असंच गाणं पुन्हा देशभर गाजवत आहे.  आता सध्या instagram, YouTube सगळीकडे हवा आहे Manike Mage Hithe या गाण्याची.

  तुम्ही सोशल मीडियावर असाल तर एव्हाना हे गाणं ऐकलंच असेल. यातले शब्द कळले नसतील आणि अर्थ तर ठो कळला नसेल. कुठून आलं हे गाणं? कुठल्या भाषेतलं आहे? कुणी गायलंय? माधुरी दीक्षितपासून प्रिया बापटपर्यंत अनेकांना यावर Insta Reel करण्याचा मोह आवरला नाही त्या गाण्यामागची गोष्ट..

  मनिके मागे हिथे हे गाणं दाक्षिणात्य भाषेतलं वाटत असलं तरी ते कुठल्याही भारतीय भाषेतलं नाही. ते आहे श्रीलंकन गाणं.... सिंहली भाषेतलं.

  लग्नात जेवण हवं मग द्या या किंमतीच्या भेटवस्तू; अजब लग्नपत्रिका होतेय VIRAL

  योहानी आणि सतीशन यांनी गायलेल्या या गाण्याने YouTube वर कमीत कमी वेळेत 100 Million views मिळवून विक्रम केला.

  " isDesktop="true" id="604834" >

  अमिताभ बच्चन यांनीही हे गाणं ऐकून त्याबद्दल पोस्ट केलं. माधुरी दीक्षितलाही यावर छोटा video करावासा वाटला आणि प्रिया बापटनेतर पैठणी नेसून यावर Reel बनवलंय. काय आहे या गाण्याची जादू?

  मूळ सिंहली भाषेतलं गाणं 2020 मध्ये रीलिज झालं होतं. ते श्रीलंकन रॅपन आणि गायिका योहानी डीसिल्व्हा हिने सिंहली भाषेतच मे 2021 मध्ये पुन्हा गायलं. अवघ्या काही महिन्यात ते भारतात हिट झालं आणि अर्थातच इथून जगभर. योहानी आणि सतीशन या दोन गायकांनी या गाण्याचं आणखी एक व्हर्जन गायलं. सध्या याच गाण्याची तमीळ, मल्याळी, तेलुगू आणि हिंदी व्हर्जन्स सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

  यशराज मुखाटे या मराठी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेण्ट क्रिएटरने या गाण्याची लोकप्रियता हेरली आणि त्याने त्यावर केलेलं insta reel हिट झालं. मग अमिताभ बच्चनपासून अनेक सेलेब्रिटींनी या गाण्याची तारिफ सुरू केली.

  View this post on Instagram

  A post shared by Priya Bapat (@priyabapat)

  प्रिया बापटने पैठणी नेसून केलेलं हे रीलही कमालीचं हिट झालं. कळत नसलं, अर्थ लागत नसला तरी या गाण्याने सगळ्यांना मोहित केलंय हे खरं. आपल्या मनात बसलेल्या सुंदरीचं वर्णन असलेलं हे गाणं आहे.

  तू माझ्या मनात ठसली आहेस. तुझा विचार आला तरी हृदयाला आग लागते. तुझ्यावरून नजर हटत नाही. तू शतजन्मापासून मला परिचित असल्यासारखं वाटतेस, इतके तुझेच विचार सतत मनात असतात. Ruwa Nari Manamali Sukumali Numba Thama

  You look like a goddess. My mind is exhilarating. You are the dearest. म्हणजे तू एखाद्या देवतेसारखी मनात ठाण मांडून बसली आहेस. माझ्या अगदी जवळ आहेस आणि माझं प्रेम फक्त तुझ्यासाठी राखून ठेवलं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Madhuri dixit, Priya bapat, Sri lanka, Viral video.