मुंबई 12 मार्च: अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही बॉलिवूडमधील सध्याची आघाडिची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या मादक अदांनी घायाळ करणाऱ्या या अभिनेत्रीची एक झलक पाहण्यासाठी चाहते तिच्या घराभोवती गर्दी करतात. अशा या लोकप्रिय अभिनेत्रीनं एका डान्सर तरुणाला डेटसाठी विचारलं. (Janhvi Kapoor ask for dating) अन् त्यानं देखील क्षणाचाही विलंब न करता जान्हवीला होकार दिला. त्यांच्या या अनोख्या डेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. जान्हवीचा रुही हा विनोदी भयपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जान्हवीनं डान्स दिवाने (Dance Deewane 3) या रिअलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. दरम्यान शोमधील एका तरुणानं जबरदस्त डान्स केला. त्याचा डान्स पाहून जान्हवी देखील चकित झाली. शोमधील सर्व पर्यावेक्षकांनी त्याची तोंड भरुन स्तुती केली. जान्हवीनं तर खुश होऊन त्याला थेट डेटसाठीच विचारलं. जान्हवीनं विचारलेला प्रश्न ऐकून त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यानं देखील कुठलाही विचार न करता थेट होकार दिला. त्यांच्या या आगळ्या वेगळ्या डेटचा व्हिडीओ कलर्स वाहिनीनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही देखील थक्क व्हाल. अवश्य पाहा - मिथिला पालकरनं केला मार्गारेका डान्स; Video पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क
‘रुही’ हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती दिनेश विजय यांनं केली आहे. यापूर्वी त्यानं ‘स्त्री’ या हॉरर कॉमेडी चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात जान्हवीसोबत राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, रोनित रॉय, वरुण शर्मा यांसारख्या अनेक कलाकारांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांच्या मिश्र प्रतिसाद मिळत आहे.