JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / जॅकलिन फर्नांडिसची दिल्ली कोर्टात धाव; 15 दिवसांसाठी परदेशात जाण्यासाठी मागितली परवानगी

जॅकलिन फर्नांडिसची दिल्ली कोर्टात धाव; 15 दिवसांसाठी परदेशात जाण्यासाठी मागितली परवानगी

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) अबू धाबी याठिकाणी होणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहाता यावे याकरता दिल्लीतील न्यायालयात याचिका दाखल केली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 11 मे: बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) अबू धाबी याठिकाणी होणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहाता यावे याकरता दिल्लीतील न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत तिने 15 दिवसांसाठी परदेशात जाण्याची परवानगी मागितली आहे. या 15 दिवसात ती अबुधाबी, फ्रान्स आणि नेपाळमध्ये फिरणार असल्याचे तिने म्हटले आहे. सुकेश चंद्रशेखर (Jacqueline Fernandez and Sukesh Chandrashekhar Case) प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर जॅकलिन आहे. अशावेळी कामाच्या वचनबद्धतेसाठी परदेशात जाण्याची परवानगी मिळावी अशी मागणी तिने कोर्टात केली आहे. जॅकलिन फर्नांडिसला अबुधाबी याठिकाणी होणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्यामध्ये उपस्थित राहायचे आहे. यानंतर कामाच्या कमिटमेंटमुळे तिला फ्रान्स आणि नेपाळचा दौरा देखील करायचा आहे. मात्र याकरता तिला परवानगी मिळाली आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेले नाही. ठग सुकेशशी संबंधित 200 कोटी रुपयांच्या खंडणीच्या प्रकरणात तिच्या विरोधात एक सक्रिय लुक आउट सर्क्युलर देखील आहे. हे वाचा- अर्जुन-मलायका लावणार ‘Koffee With Karan-7’ मध्ये हजेरी,लग्नाबाबत करणार मोठा खुलासा? 7.27 कोटींची संपत्ती जप्त काही दिवसांपूर्वी अंमलबजावणी संचालनालयाने बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची 7.27 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. कॉनमन सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar Money Laundering Case) ज्या मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात आहे त्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली होती. जी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे ती फिक्स्ड डिपॉझिट असल्याची माहितीही समोर आली होती. यापूर्वी 5 डिसेंबर 2021 रोजी देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या या अभिनेत्रीला मुंबई विमानतळावर थांबवण्यात आले होते. तिच्याविरोधात ईडीने लुकआउट नोटीसही जारी केली होती. याप्रकरणात आधी ईडीच्या टीमने अभिनेत्रीची तीन वेळा चौकशी केली आहे. हे वाचा- शाहिद, ईशान आणि कुणालची बॉईज गॅंग निघाली रोड ट्रीपवर, बाईकवर फिरणार ‘हा’ देश जॅकलिन फर्नांडिस व्यतिरिक्त सुकेशने ईडीकडे केलेल्या खुलाशांमध्ये नोरा फतेही, श्रद्धा कपूर, शिल्पा शेट्टी आणि हरमन बावेजा यांसारख्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नाव देखील घेतली होती. दरम्यान त्यानंतर आता अलीकडेच जॅकलिन नुकतीच सलमान खानच्या ईद पार्टीत दिसली होती. तसंच जॅकलिन-सलमानचा एका अनाथाश्रमातील मुलांसह मस्ती करतानाचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या