मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

शाहिद कपूर, ईशान आणि कुणाल खेमूची बॉईज गॅंग निघाली रोड ट्रीपवर, बाईकवर फिरणार 'हा' देश

शाहिद कपूर, ईशान आणि कुणाल खेमूची बॉईज गॅंग निघाली रोड ट्रीपवर, बाईकवर फिरणार 'हा' देश

 सर्वसामान्य लोक असो किंवा बॉलिवूड   (Bollywood)  कलाकार नेहमीच व्हेकेशनवर जाण्यासाठी उत्सुक असतात. किंवा अनेक लोक ट्रेकिंग बाईक रायडिंगसाठी आतुर असतात. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. अशातच बॉलिवूड सेलिब्रिटी कसे मागे राहतील.

पुढे वाचा ...
  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 11 मे-  सर्वसामान्य लोक असो किंवा बॉलिवूड   (Bollywood)  कलाकार नेहमीच व्हेकेशनवर जाण्यासाठी उत्सुक असतात. किंवा अनेक लोक ट्रेकिंग बाईक रायडिंगसाठी आतुर असतात. सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक लोक बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन करत आहेत. अशातच बॉलिवूड सेलिब्रिटी कसे मागे राहतील. काही दिवसांपूर्वीच, शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत तिच्या गर्ल गँगसोबत दुबई व्हेकेशनसाठी गेली होती. त्यानंतर आता शाहिद कपूर  (Shahid Kapoor) त्याच्या बॉईज गॅंगसोबत  (Boys Gang) बाईक घेऊन निघाला आहे. शाहिदच्या बॉईज गँगचे फोटो पाहून हे सर्व लोक त्यांचा पुढील प्रवास बाइकवरूनच करणार असल्याचं स्पष्ट होत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहिद कपूर त्याचा भाऊ आणि अभिनेता इशान खट्टर   (Ishan Khattar)  आणि कुणाल खेमू (Kunal Khemu) यांची बाइकर गँग युरोपमध्ये पोहोचली आहे. शाहिदने त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याची झलकही शेअर केली आहे. शाहिद कपूरने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये त्याच्यासोबत ईशान खट्टर, कुणाल खेमू आणि ब्लॉगर सुवेद लोहिया देखील दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलंय की, "Boys with their toys" आणि या फोटोमध्ये त्याने त्याच्या सर्व मित्रांना टॅगदेखील केलं आहे. तर दुसरीकडे कुणाल खेमूने हा फोटो शेअर करत लिहिलंय,'लेट्स गो बॉईज अँड गर्ल्स'.सध्या या तिघांची ही पोस्ट आणि त्यांची बाइकर गॅंग चांगलीच चर्चेत आहे.

फोटोमध्ये, ईशान, शाहिद, कुणाल, सुवेद आणि त्यांचे मित्र त्यांच्या, कॅज्युअल कपड्यांमध्ये आणि सनग्लासेसमध्ये कॅमेरासाठी पोज देत आहेत. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांसोबतच सेलेब्सही जोरदार कमेंट करत आहेत. कुणालची मेहुणी सबा अली खानने कमेंट करत लिहिलय, "सुरक्षित आणि सुपरजर्नी." एका युजरने कमेंट करत लिहिलं"कुठे जात आहात?" दुसर्‍या युजरने गंमतीत लिहिलंय, "त गँग्स ऑफ बॉलिवूड" तर आणखी एकाने प्रश्न विचारत लिहिलंय, "सर कुठे आहात?...खूप एन्जॉय करा"

शाहिदच्या सोशल मीडियावरुन त्याला ट्रॅव्हलिंगची किती आवड आहे हे दिसून येते. दरवर्षी शाहीद, कुणाल आणि ईशान बाइकिंग साहसांचा आनंद घेण्यासाठी टूरवर जातात. शाहिद कपूर नुकतंच स्पोर्ट्स ड्रामा 'जर्सी' मध्ये दिसला. हा चित्रपट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. हा चित्रपट प्रेक्षकांच्या फारसा पसंतीस उतरला नाही.

First published:

Tags: Bollywood News, Entertainment, Shahid kapoor