Home /News /entertainment /

अर्जुन-मलायका लावणार 'Koffee With Karan-7' मध्ये हजेरी,लग्नाबाबत करणार मोठा खुलासा?

अर्जुन-मलायका लावणार 'Koffee With Karan-7' मध्ये हजेरी,लग्नाबाबत करणार मोठा खुलासा?

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) आज इंडस्ट्रीमध्ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत. हा अभिनेता व्यवसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेसुद्धा प्रचंड चर्चेत असतो. सध्या तो अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा (Malaika Arora) हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत जोडप्यांपैकी एक आहेत.

पुढे वाचा ...
    मुंबई,11 मे-  बॉलिवूड   (Bollywood)  अभिनेता अर्जुन कपूरने  (Arjun Kapoor)  आज इंडस्ट्रीमध्ये 10 वर्षे पूर्ण केली आहेत. हा अभिनेता व्यवसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेसुद्धा प्रचंड चर्चेत असतो. सध्या तो अभिनेत्री मलायका अरोराला डेट करत आहे. अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा  (Malaika Arora)  हे बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही अनेकदा रोमँटिक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर धुमाकूळ माजवतात. पण अर्जुन आणि मलायका हे दोघेही काही वेळा त्यांच्या वयातील अंतरामुळे सोशल मीडियावर ट्रोलदेखील होत असतात.परंतु या दोघांना त्या गोष्टींचा अजिबात फरक पडत नाही. दरम्यान या कपलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिपोर्टनुसार, मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर करण जोहरच्या लोकप्रिय चॅट शो 'कॉफी विथ करण-7'   (Koffee With Karan-7)  मध्ये दिसणार आहेत. जो लवकरच OTT प्लॅटफॉर्मवर सुरू होणार आहे. इंडिया टुडे.इनच्या रिपोर्टनुसार, 'कॉफी विथ करण' या चॅट शोच्या सातव्या सीजनमध्ये, शोच्या निर्मात्यांनी पाहुणे म्हणून 5-6 जोडप्यांना संपर्क साधला आहे. या जोडप्यांशी वेळ आणि तारखेबाबत चर्चा सुरू आहे. या यादीत बॉलिवूडच्या मलायका-अर्जुन या सुंदर जोडप्याच्या नावाचाही समावेश आहे. ज्यांना निर्मात्यांनी संपर्क साधला आहे.रिपोर्टनुसार, मलायका-अर्जुन, ज्यांनी 2019 मध्ये आपलं नातं अधिकृतरित्या जाहीर केलं होतं, ते या शोमध्ये एकत्र दिसणार आहेत. या शोमध्ये दोघे लग्नाबाबत काही खुलासा करणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. मात्र या दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाहीय. (शाहिद, ईशान आणि कुणालची बॉईज गॅंग निघाली रोड ट्रीपवर, बाईकवर फिरणार 'हा' देश) चित्रपट दिग्दर्शक करण जोहर 'कॉफी विथ करण 7' मधून पुनरामन करत आहे. करणच्या शोमध्ये कोण कोण हजेरी लावणार आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही पण वृत्तांवर विश्वास ठेवला तर पहिला एपिसोड आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसोबत शूट केला जात आहे. हे दोन्ही स्टार्स लवकरच करणच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'मध्ये दिसणार आहेत.तसेच 'पुष्पा' फेम साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदनासुद्धा या शोमध्ये दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Arjun kapoor, Bollywood actress, Entertainment, Malaika arora

    पुढील बातम्या