मुंबई, 25 नोव्हेंबर: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम इंडियन आयडॉल सध्या चर्चेमध्ये आहे. लवकरच या कार्यक्रमाचं नवीन पर्व येणार असून यामध्ये अनेक प्रतिभावान कलाकार दिसून येणार आहेत. कार्यक्रमाच्या प्रमोमध्ये हे दिसून येत आहे. या कार्यक्रमाचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओत युवराज नावाच्या एका स्पर्धकाची कथा दाखवण्यात येत आहे. या व्हिडिओत तो आपली संघर्षकथा सांगताना दिसून येत आहे. युवराजने आपली संघर्षमय कहाणी जजना सांगितली आहे. या तो म्हणाला, ‘इंडियन आयडॉलचा सेट झाडण्याचं कामही मला करावं लागलं आहे’ त्याची ही कथा ऐकून नेहा कक्कर, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया हे तिन्ही जज इमोशनल झालेले या प्रोमोत दिसत आहेत. सोनीने हा प्रोमो शेअर केला असून यामध्ये युवराज नावाचा हा सहभागी स्पर्धक मराठी गाणं गाताना दिसत आहे. त्याचा आवाज ऐकल्यानंतर तिनही जज त्याचं कौतुक करताना दिसत आहेत. या त्याच्या संघर्षाविषयी बोलताना त्याने सांगितले, ‘सेटवर तो झाडू मारायचे काम करत असे. त्यावेळी कार्यक्रमात जज कोणतीही महत्त्वाची माहिती देत असतं तेव्हा तो ती लक्षपूर्वक ऐकत असे. त्यामुळे माझ्या गाण्यामध्ये सुधारणा करण्यास मदत होत असे. युवराजचं बोलणं ऐकून या तिघांना अश्रू अनावर झाले.
या व्हिडिओत आपण स्पष्टपणे पाहू शकतो की, नेहा कक्कर रडताना दिसत आहे. तर विशाल दादलानीदेखील त्याच्या या संघर्ष कथेने चकित होऊन आपल्या हाताने चेहरा झाकताना दिसत आहे. हिमेश रेशमियाने याविषयी बोलताना तुझी कथा खरंच प्रेरणादायक असल्याचं म्हटलं आहे. कोणतीही गोष्ट अशक्य नसल्याचेदेखील तू दाखवून दिल्याचे हिमेश रेशमिया म्हणाला. येत्या 28 नोव्हेंबरपासून इंडियन आयडॉलच्या नवीन पर्वाला सुरुवात होणार आहे. या कार्यक्रमधील जज नेहा कक्कर हिचे नुकतेच लग्न झाले आहे. ती आपला पती रोहनप्रीतसह नुकतीच दुबईवरून हनिमूनहून परतली असून तिने कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. इंडियन आयडॉल हा सोनी टीव्हीचा खूप जुना टीव्ही शो असून यातून अनेक उदयोन्मुख गायक पुढे आले आहेत. त्यापैकी अनेकांनी बॉलिवडूमध्ये पदार्पण करून आपलं वेगळं स्थानही निर्माण केलं आहे. त्यामुळे संपूर्ण देशातून या गेम शोला उत्तम प्रतिसाद मिळतो.