मुंबई 26 मे : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Tarak Mehta Ka Oolta Chashmah) आता एक दशकाहून अधिक काळ सुरू आहे. मालिकेने आजवर प्रेक्षकांच तूफान मनोरंजन केलं तर अजूनही करतच आहे. मालिकेतील महत्त्वाचं पात्र जेठालालचे असंख्य चाहते आहेत. जेठालाल म्हणजेच अभिनेते दिलीप जोशी (Dilip Joshi). पण असाही एक काळ होता जेव्हा जोशी यांना कामासाठी भटकाव लागलं होतं. गुजरातच्या पोरबंदर या ठिकाणी एक गुजराती कुटुंबात दिलीप जोशी यांचा जन्म झाला होता. 26 मे 1968 ला त्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 12 व्या वर्षापासूनच त्यांनी अभिनयात रस घेतला होता. त्यांनी नाटकांपासून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 1989 साली त्यांनी ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात रामूची भूमिका साकरली होती. यानंतरही ते अनेक चित्रपट , मालिकांत लहान मोठी पात्र साकारत होते. पण त्यांना खरी ओळख मिळाली ती ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील ‘जेठालाल’ (Jethalal) या पात्राने.
एका मुलाखतीत जोशी यांनी सांगितले होते की, ‘तारक मेहता..’ मालिकेआधी जवळपास वर्षभर त्यांच्याकडे कोणतच काम नव्हतं ते कामासाठी अक्षरशः भटकत होते. 2008 साली त्यांना ‘तारक मेहता..’ मालिका मिळाली होती. आणि त्यानंतर या मालिकेने कधीच पूर्णविराम घेतला नाही. मालिका तसेच त्यातील प्रत्येक पात्र हे आज प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. त्यातील दिलीप यांच जेठालाल हे पात्र विशेष गाजलं. त्यांच्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे.
अभिनयाव्यतिरिक्त दिलीप हे एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. पण आपली अभियातील रुची पाहता त्यांनी नोकरी न करता या क्षेत्रात करिअर केलं. त्यांना दोन वेळा इंडियन नॅशनल थिएटर उत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कारही मिळाले आहेत.
दीपिका - भन्साळी पुन्हा एकदा एकत्र; बिग बजेट चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मालिकेमुळे जोशी यांच संपूर्ण करिअर बदललं. महिन्यातून 25 दिवस ते काम करतात. तर महिन्याला ते लाखोंचं मानधनही घेतात. ते आपल्या कुटुंबासोबत मुंबईत राहतात. पत्नी तसेच दोन मुलं असा त्यांचा परिवार आहे. त्यांना गाड्यांचा छंद आहे. त्यांच्यांकडे ऑडी सहीत अन्य काही कार आहेत.