पैसे नसल्यानं सलमान खाननं या जिममधून केली बॉडी बिल्डिंगला सुरुवात; वर्षाला होती 60 रुपये फी
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, भन्साळी सध्या या नव्या चित्रपटाच्या कामात व्यस्त आहेत. या चित्रपटाच्या सुरुवातीपासूनच भन्साळींना दीपिकाला या भूमिकेसाठी निवडायचं होतं. ‘रुपमती’ (Roopmati) ही भूमिका दीपिका साकारणार आहे. दीपिका आणि भन्साळी यांनी या चित्रपटासाठी अनेकदा चर्चा तसंच भेटीही घेतल्या आहेत. अजून पेपरवर्क बाकी असलं, तरीही दोघांनीही चित्रपटासाठी सहमती दर्शवली आहे. लवकरच चित्रपटाच्या इतर कामकाजालाही सुरूवात होणार आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपट पुढील वर्षी मे ते जूनच्या दरम्यान प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 1952 चा चित्रपट ‘बैजू बावरा’चं हे नव रुप प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दीपिका व्यतिरिक्त अन्य भूमिकांविषयी अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे आता आणखी कोणत्या कलाकारांची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दीपिकाने याआधी ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ सारखे हीट चित्रपट भन्साळी यांच्यासोबत केले आहे. त्यामुळे या नव्या चित्रपटासाठी प्रेक्षक अतिशय उत्सुक आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Deepika padukone, Entertainment, Sanjay Leela Bhansali