JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / OTT प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशीपची टांगती तलवार; प्रकाश जावडेकरांनी दिले संकेत

OTT प्लॅटफॉर्मवर सेन्सॉरशीपची टांगती तलवार; प्रकाश जावडेकरांनी दिले संकेत

गेल्या काही दिवसांपासून Amazon Prime Video वर प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ (Tandav) वेब सीरीजमधील काही दृश्यांमुळे विशिष्ट लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 31 जानेवारी: गेल्या काही दिवसांपूर्वी Amazon Prime Video वर प्रदर्शित झालेल्या ‘तांडव’ वेब सीरीजमधील काही दृश्यांमुळे विशिष्ट लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता. या अनुषंगाने देशातील विविध ठिकाणी या वेब सीरीजशी संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तांडवमधील आक्षेपार्ह दृश्य हटवल्यानंतर हा वाद निवळल्याचं पाहायला मिळालं आहे. पण आता ओटीटी प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन स्ट्रीमिंग संदर्भात नियमावली बनवली जाणार असल्याचं केंद्र सरकारने सांगितलं आहे. ओटीटी नियमनाची मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जाहीर केली जाणार आहेत. या संदर्भात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी रविवारी सांगितलं की, ‘मंत्रालय लवकरच ओव्हर द टॉप (ओटीटी) प्लॅटफॉर्मसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. कारण सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या वेब सीरीजसंदर्भात बऱ्याच तक्रारी आल्या आहेत. अलीकडेच ‘तांडव’, मिर्झापूर आणि ‘अ सुटेबल बॉय’ या वेब सीरीजबद्दल इतका वाद वाढला होता की, त्यांच्यावर अनेक ठिकाणी खटले दाखल करण्यात आले आहेत.

संबंधित बातम्या

जावडेकर यांनी यावेळी पत्रकारांना सांगितलं की, ‘ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या काही वेब सीरीजविरूद्ध बर्‍याच तक्रारी आल्या आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केलेले चित्रपट आणि मालिका, डिजिटल वर्तमानपत्रे, केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अ‍ॅक्ट किंवा सेन्सॉर बोर्डाच्या कार्यक्षेत्रात येत नाहीत. त्यामुळे लवकरच या सर्वांचं नियमन करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जावडेकरांनी असंही सांगितलं की, ‘1 फेब्रुवारीपासून सिनेमागृहातील सर्व खुर्च्या भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्यासाठी कोविड -19 संबंधित सर्व प्रोटोकॉल पाळावे लागतील. ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सामग्रीमुळे अलीकडे बर्‍याच विवादांना तोंड फुटलं आहे. त्यामुळे बराच वादंग उभा राहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या