मुंबई, 04 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) त्याच्या फोटो आणि व्हिडीओमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतो. कुणाला सांगून खरं वाटणार नाही पण मिलिंद सोमण आज 55वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या फिटनेसचे अनेक चाहते आहेत. या वयातही तो स्वतःला इतकं फिट आणि तंदुरुस्त कसं काय ठेवतो असा प्रश्न त्याचे प्रशंसक नेहमी विचारतात. ‘रनिंग’ हा मिलिंदच्या आयुष्यातील महत्वाचा भाग आहे. याबाबतीत त्याने वेळोवेळी सर्वाना प्रेरित केले आहे. दरम्यान त्याच्या वाढदिवसानिमित्तही त्याने फिटनेस आणि रनिंगचे महत्व सांगणारी पोस्ट शेअर केली आहे. मिलिंद त्याच्या वाढदिवशी समुद्रावर धावतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. मिलिंडच्या या फोटोची विशेष चर्चा होत आहे कारण कपडे न घालताच यावेळी तो समुद्रावर धावला आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये मिलिंद त्याची फिट बॉडी फ्लॉंट करत आहे.
एकीकडे तो त्याच्या चाहत्यांना ‘Fitness Goals’ देत आहे, तर दुसरीकडे त्याच्या या हॉट लुकचं कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्याने हा फोटो पोस्ट केल्यानंतर त्यावर हजारो लाईक्स आले आहेत. हा फोटो शेअर करताना मिलिंदने असं कॅप्शन दिले आहे की, ‘Happy Birthday to Me.. #55’ मिलिंदचा हा फोटो स्वतः त्याची पत्नी अंकिता हिने क्लिक केला आहे. मिलिंद सोमणची बायको अंकिता देखील फिटनेसच्या बाबतीत काटेकोर आहे, त्याचप्रमाणे त्याच्या आईचे देखील फिटनेसमुळे अनेक चाहते आहेत. दरम्यान त्याची बायको अंकिता हिने देखील मिलिंदसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. #happybirthday #55 #happybirthdaymilindsoman pic.twitter.com/hHpViJzJJS
मिलिंदचा वाढदिवसानिमित्त अंकितान एक पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. तिने 12 किलोमीटरच्या रनिंगनंतरचा मिलिंदबरोबरचा फोटो शेअर केला आहे. तिचं मिलिंदवर असणारं प्रेम व्यक्त करणारं खास कॅप्शन देखील तिने या पोस्टला दिलं आहे.