मुंबई 12 एप्रिल**:** हेमा मालिनी (Dharmendra) आणि धर्मेंद्र (Hema Malini) यांचं प्रेम प्रकरण सर्वांनाच माहित आहे. हेमाजींना प्रेमात पाडण्यासाठी त्यांनी कोणत्या उठाठेवी केल्या होत्या याबाबत धर्मेंद्र यांनी अनेकदा सांगितलं आहे. परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हेमाजींच्या प्रेमात पडण्यापूर्वी धर्मेंद्र एक दुसऱ्याच अभिनेत्रीच्या प्रेमात होते. आपल्या अनोख्या अॅक्शन स्टाईलमुळं त्यांना बॉलिवूडचे हिमॅन (He-Man) असं म्हटलं जातं. परंतु खरं त्या अभिनेत्रीला इम्प्रेस करण्यासाठी त्यांनी अवतार धारण केला होता. धर्मेंद्र यांनी स्वत: तो गंमतीशीर किस्सा सांगितला. धर्मेंद्र यांनी नुकतंच डान्स दिवाने या शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्यातील काही थक्क करणारे प्रसंग सांगितले. लहान असताना त्यांचं अभिनेत्री वहिदा रहमान (Waheeda Rehman) यांच्यावर प्रेम होतं. ‘चौदहवीं का चांद’ (Chaudhvin Ka Chand) हा चित्रपट पाहिल्यानंतर त्या काळातील प्रत्येक तरुण वहिदा यांच्यासाठी वेडा झाला होता. अन् त्यामध्ये धर्मेंद्र देखील होते. बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर अनेकदा त्यांनी वहिदा यांना भेटण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूड पार्ट्यांमध्ये त्यांची भेटही झाली पण भीतीमुळं त्यांनी आपल्या भावना कधी व्यक्त केल्या नाहीत. त्यांच्या मते स्त्रीयांशी फ्लर्ट करण्यात ते थोडे कमजोर होते. अर्थात मग वहिदा यांना एम्प्रेस करण्यासाठी त्यांनी हिमॅन हा अवतार धारण करुन काही अक्शनबाज चित्रपटांमध्ये काम केलं. त्यांचा हा डॅशिंग अवतार वहिदा रहमान यांना देखील खूप आवडला होता. विशेष म्हणजे हा अनुभव सांगताना त्यादेखील डान्स दिवाने या शोमध्ये हजर होत्या. अवश्य पाहा - खेसारी लालच्या कोलगेट डान्सचा धुमाकूळ; काही तासांत मिळाले 4 कोटी व्ह्यूज धर्मेंद्र यांचा किस्सा ऐकून वहिदा देखील शांत बसल्या नाहीत. त्यांनी देखील आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत एक किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “धर्मेंद्र जे सांगतायेत ते अर्धसत्य आहे. त्यांनी माझ्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न केला होता. अर्थात ते इतकं शालीन शब्दात होतं कि त्याला फ्लर्ट म्हणायचं कि स्तुती हा मला प्रश्न पडला होता. त्यांचा हिमॅन अवतार पाहून त्या काळातील सर्वच तरुणी त्यांच्यामागे वेड्या होत्या. अन् इतक्या लोकप्रिय अभिनेत्याचं माझ्यावर प्रेम होतं हे ऐकून मला खूप आनंद झाला”