मुंबई, 24 जून : बाॅलिवूडमधील अनेक जोड्या नेहमीच चर्चेत असलेल्या पहायला मिळतात. ‘परफेक्ट कपल’ (Perfect Couple) म्हणून गणती होणाऱ्या अनेक कलाकारांविषयी तुम्हाला काही धक्कादायक गोष्टी माहित आहे का?. अनेक प्रसिद्ध कलाकारांनी लग्नबंधनात असतानादेखील दुसऱ्या महिला कलाकारांवर प्रेम केलं आहे(Affair after marriage). आपल्या पत्नीला धोका दिला आहे. त्यामुळे ते चर्चेतंही आले मात्र नंतर त्यांनी त्यांच्या चुकीची माफी मागत आपला संसारावर लक्ष केंद्रित केलं. आपण अशाच काही प्रसिद्ध जोड्यांविषयी पाहणार आहोत की कोण कोण या जाळ्यात अडकलं होतं. अक्षय कुमार - अक्षय कुमार ट्विंकल खन्नासोबत लग्नात असतानादेखील प्रियंका चोप्रावर प्रेम करुन बसले होते. त्यानंतर ट्विंकलनं अक्षय कुमारला समजवल्यानंतर त्यानी हा विषय सोडून दिला आणि आपल्या संसारावर लक्ष केंद्रित केलं. राज कपूर - राज कपूरचा कृष्णासोबत विवाह झाला होता. मात्र तरीही त्यांना नरगिसवर प्रेम झालं. यावरुन कृष्णा राज कपूरवर खूप नाराज झाली होती. काही काळानंतर त्यांच्यामध्ये सगळ्या गोष्टी ठीक झाल्या. हेही वाचा - कार्तिक आर्यनला गिफ्ट मिळाली भारतातील पहिली McLaren Gt; किंमत कोटींच्या घरात अजय देवगण - अजय देवगणनं ‘वन्स अपाॅन टाईम’ चित्रपटात अभिनेत्री कंगनासोबत काम केलं होतं. यानंतर अजय देवगण आणि कंगनामध्ये जवळीकस निर्माण झाल्याच्या बातम्या यायला सुरुवात झाली. यावेळी अजय देवगण काजल यांचं लग्न झालेलं होतं. या गोष्टी समोर आल्यावर अजयनं काजलची माफी मागितली होती. अमिताभ बच्चन - बाॅलिवूडचे बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चनचं देखील या यादीत नाव आहे. अमिताभ यांचं जया भादुडी यांच्याशी लग्न झालेलं असतानादेखील त्यांचं नाव रेखा यांच्याशी जोडलं गेलेलं होतं. अनेक कालावधीपर्यंत त्यांचं अफेअर असल्याच्या बातम्या होत्या. या गोष्टीनं अमिताभ यांच्या संसारावर परिणाम केलेला पहायला मिळाला. नंतर हे सगळं शांत झालं. अद्यापही कधी कधी त्यांच्याविषयी बातम्या येतात. गोविंदा - गोविंदाचं नाव अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत जोडलं गेलं होतं. दोघांचे मार्ग वेगळे झाल्यानंतर गोविंदानं त्याची लहानपणाची मैत्रिण सुनितासोबत लग्न केलं. हेही वाचा - Ranbir Kapoor: रणबीरने बायको अलियाला दिली ‘ही’ उपमा; नात्यात लावला वरण-भाताचा तडका शत्रुघ्न सिन्हा - शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांची पत्नी पुनम सिन्हानं अनेक वेळा रीना राॅयसोबत रंगेहाथ पकडलं. मात्र नंतर त्यांच्यामध्ये सगळंकाही ठीक झालं. शाहरुख खान - शाहरुखचं गौरीसोबत लग्न झालेलं आहे. गौरीसोबत लग्न झालेलं असतानाही त्याचं प्रियंकासोबत नाव जोडलं गेलं. प्रियंकावरुन दोघांमध्ये तू तू मै मै ही झाली. मात्र नंतर शाहरुखनं गौरीला समजवल्यानंतर दोघांमध्ये सगळं व्यवस्थित झालं. आदित्य पांचोली - आदित्य पांचोलीचं जरीना वहाबसोबत लग्न झालेलं असतानाही त्यांना कंगना रणौत आवडत होती. यामुळे आदित्यचं त्याची पत्नी जरीनासोबतचे संबंध खराब झाले होते. काही काळानंतर त्यांच्यात सगळं ठीक झालं.