इ टाईम्सच्या रिपोर्टनुसार कार्तिक आर्यनबाबत बोलताना टी सिरीजचे मालक आणि निर्माता भूषण कुमार यांनी म्हटलं, ''कार्तिक आर्यन हा एखाद्या ध्येयाने, चैतन्याने पछाडलेला आहे. एका अतिशय व्यावसायिक टप्प्यावर आमचं नातं सुरु झालं होतं. मात्र आता हे नातं कित्येक पटींनी मजबूत झालं आहे. प्रत्येक प्रोजेक्ट्समध्ये त्याचं समर्पण उल्लेखनीय आहे. ही कार त्याच्या याच कठोर परिश्रमाचं आणि धैर्याचं प्रतीक आहे. त्याच्यात वेळोवेळी आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं आहे. आणि आम्हाला हे नातं भविष्यात आणखी घट्ट करण्याची ईच्छा आहे. (हे वाचा:Anushka Shetty car collection: 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टीने आपल्या ड्रॉयव्हरला गिफ्ट केली होती इतकी महागडी कार; पाहा अभिनेत्रीचं Car कलेक्शन ) कार्तिक आर्यन-कियारा आडवाणी (Kiara Advani) स्टारर 'भूल भुलैया 2' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरत आहे. हा 'भूल भुलैय्या' चा सिक्वेल आहे. 'भूल भुलैया' हा चित्रपट 2007 मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटालाही चांगलं यश मिळालं होतं. या चित्रपटात अक्षय कुमार, विद्या बालन, राजपाल यादव, अमिषा पटेल, आणि शायनी आहुजा मुख्य भूमिकेत होते.कार्तिक आर्यनचा हा चित्रपट याच चित्रपटाचा सिक्वेल आहे. त्यांनतर आता निर्माते या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची तयारी करत असल्याचं मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Kartik aryan