मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Ranbir Kapoor: रणबीरने बायको अलियाला दिली 'ही' उपमा; नात्यात लावला वरण-भाताचा तडका

Ranbir Kapoor: रणबीरने बायको अलियाला दिली 'ही' उपमा; नात्यात लावला वरण-भाताचा तडका

बॉलिवूडच्या अत्यंत चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक जोडी म्हणजे रणबीर आणि आलियाची. रणबीर कपूर पहिल्यांदाच स्वतःच्या बायकोबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना दिसला. तो नक्की काय म्हणाला?

बॉलिवूडच्या अत्यंत चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक जोडी म्हणजे रणबीर आणि आलियाची. रणबीर कपूर पहिल्यांदाच स्वतःच्या बायकोबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना दिसला. तो नक्की काय म्हणाला?

बॉलिवूडच्या अत्यंत चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक जोडी म्हणजे रणबीर आणि आलियाची. रणबीर कपूर पहिल्यांदाच स्वतःच्या बायकोबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना दिसला. तो नक्की काय म्हणाला?

    मुंबई 24 जून: बॉलिवूडमध्ये सध्या ज्या एका कपल बद्दल भयानक चर्चा सुरु आहे ते म्हणजे (Alia Bhatt-Ranbir Kapoor) आलिया आणि रणबीर. रणबीर आलियाने एप्रिल महिन्यात एकमेकांशी लग्न करत (Alia Bhatt-Ranbir Kapoor marriage) चाहत्यांनासुखद धक्का दिला होता. त्यांच्या लग्नाची अगदी कोणते celebs काय परिधान करणार इथपासून जेवणाचा बेत काय इथपर्यंत अनेक छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती प्रसारमाध्यमांकडून दिली जात होती. आज पहिल्यांदाच रणबीर त्याच्या बायकोबद्दल म्हणजे (Ranbir Kapoor on Alia Bhatt) आलियाबद्दल मोकळेपणाने प्रसारमाध्यमांशी बोलताना दिसला.

    रणबीर आणि आलिया यांची लव्हस्टोरी अनेक वर्ष जुनी आहे. रणबीरचं नाव याआधी (Ranbir and Katrina) कतरीना मग दीपिकासुद्धा (Ranbir and Deepika) जोडलं गेलं. बॉलिवूडचा हा डॅशिंग हिरो मात्र कायमच त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असायचा. रणबीर आणि आलिया डेट करत असल्यापासूनच अनेकांना त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली होती. लग्नाआधी दोघांपैकी आलियाने काही मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल वाचत्या केली होती पण रणबीरने खुलेपणाने एकमेकांबद्दल, त्यांच्या प्रेमाबद्दल वाचत्या केली नव्हती ज्यातून त्यांच्या नात्याचा उलगडा होऊ शकेल. आज ‘समशेरा’ (Samshera Trailer Launch)  सिनेमाच्या ट्रेलर लाँचला तो आलियाबद्दल भरभरून बोलताना दिसला.

    रणबीर म्हणाला, “हे वर्ष माझ्यासाठी खूप मोठं आहे. या वर्षी माझं आलियाशी लग्न झालं. आलिया ही एक उत्तम पार्टनर आहे. मी अनेकदा चित्रपटात म्हणलं आहे की लग्न म्हणजे दाल-चावल खाल्ल्यासारखं आहे. तेच ते सारखं सारखं जेवण जेवल्यासारखं लग्न असतं असं मी चित्रपटात म्हणलो होतो. आयुष्यात तंगडी कबाब, खिमापाव, हाका नूडल्स थोडं चमचमीत जेवण सुद्धा असलं पाहिजे. पण आयुष्यात अनुभवांतून मी हे शिकलो की दाल-चावल सारखं सुंदर काहीच नाहीये. आलिया इतकी अप्रतिम (Ranbir Kapoor Wife) बायको मिळणं माझं भाग्य आहे.”

    View this post on Instagram

    A post shared by Filmfare (@filmfare)

    अर्थात लग्नासारख्या कंटाळवाण्या गोष्टीत अडकू नये असं तो अनेक सिनेमात म्हणाला होता. त्याच्या एकंदर आयुष्याकडे बघून तो कितपत सिरीयस होऊन लग्न करेल अशी शंका काहींना आलेली. पण त्याने आलियाचं एवढं कौतुक केलेलं ऐकून लग्नामुळे त्याच्या आयुष्यात जास्त आनंद आला आहे असं आपण म्हणू शकतो.

    हे ही वाचा- सैफ अली खानच्या लेकाला नव्हे तर 'या' अभिनेत्याला डेट करतेय श्वेता तिवारीची मुलगी; नाव जाणून वाटेल आश्चर्य

    रणबीर सध्या आगामी काळात बऱ्याच धमाकेदार चित्रपटातून समोर येणार आहे. एकीकडे जुलै महिन्यात ‘समशेरा’ तर सप्टेंबर महिन्यात ‘ब्रम्हास्त्र’ अशा दोन बिगबजेट चित्रपटात तो दिसणार आहे. ब्रह्मास्त्रामध्ये आलिया-रणबीर ही जोडी एकत्र पाहायला मिळणार आहे.

    First published:

    Tags: Alia Bhatt, Bollywood actor, Bollywood actress, Bollywood News, Cute couple, Marriage, Ranbir kapoor