JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / दीपिका पादुकोणच्या हातातील या छोट्याशा घड्याळाच्या किमतीत तुम्ही एक घर घेऊ शकता; आकडा पाहूनच उंचावतील भुवया

दीपिका पादुकोणच्या हातातील या छोट्याशा घड्याळाच्या किमतीत तुम्ही एक घर घेऊ शकता; आकडा पाहूनच उंचावतील भुवया

Levis जीन्सनंतर दीपिका आता जगप्रसिद्ध चोपार्ड (Chopard) या घड्याळांच्या (Watches) ब्रँडची ब्रँड अँम्बेसेडर (Brand Ambassador) बनली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 एप्रिल: बॉलिवूडची ‘मस्तानी’ (Bollywood) अर्थात आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) जागतिक पातळीवरही तितकीच लोकप्रिय आहे. हॉलिवूडमध्येही तिनं काम केलं असून, जगभरात तिचे चाहते आहेत. उत्तम फॅशन सेन्ससाठीही ओळखल्या जाणाऱ्या दीपिकाच्या महागड्या ड्रेसेसची, दागिन्यांची, उंची राहणीमानाची नेहमीच चर्चा होत असते. देश-परदेशातल्या अनेक बड्या ब्रँडसची ती ब्रँड अँम्बेसेडर असून, अनेक ब्रँडस तिनं आपल्या उत्पादनाची जाहिरात करावी यासाठी धडपडत असतात. Levis जीन्सनंतर दीपिका आता जगप्रसिद्ध चोपार्ड (Chopard) या घड्याळांच्या (Watches) ब्रँडची ब्रँड अँम्बेसेडर (Brand Ambassador) बनली आहे. त्यामुळे दीपिका आता ज्युलिया रॉबर्टस, रिहाना अशा आंतराराष्ट्रीय ख्यातीच्या मॉडेल्सच्या पंगतीत जाऊन बसली आहे. चोपार्ड हा स्वित्झर्लंडमधील (Switzerland) अतिशय महागड्या घड्याळांचा ब्रँड असून, त्यांचे दागिनेही प्रसिद्ध आहेत. या आधी आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना याची ब्रँड अँम्बेसेडर होती. नुकताच दीपिकानं चोपार्डच्या हॅपी स्पोर्ट कलेक्शनमधील एक सुंदर घड्याळ आणि एक सुंदर ब्रेसलेट घातलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं लेदर बेल्ट असलेलं रोज गोल्ड डायलचं हिरे (Diamonds) असलेलं चोपार्डचं घड्याळ घातलं आहे. या घड्याळाची किंमत तब्बल 18 लाख रुपये आहे. या बरोबर तिनं हातात चोपार्डचं हॅपी हार्ट्स असणारं ब्रेसलेट घातलं असून, त्यातही हिरे आणि एक मोती जडवला आहेत. दीपिकानं हे घड्याळ घातलेली एक पोस्ट शेअर केली आहे.

(वाचा -  चाहत्याने Kiss करतानाचा Video झाला होता व्हायरल, 2 दिवसांनी अभिनेत्री पॉझिटिव्ह )

सोशल मीडियावर तिच्या या फोटोचीच चर्चा आहे. सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळवणाऱ्या आंतराराष्ट्रीय स्टार्सच्या यादीत आता दीपिकाचंही नाव आलं आहे. ती एक पॉवरफुल ग्लोबल आयकॉन बनली आहे. दीपिकाच्या या फोटोवर तिचा पती अभिनेता रणवीर सिंग (Ranveersing) यानंही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संबंधित बातम्या

दीपिका नेहमीच उंची ड्रेस, दागिने, इतर अॅसेसरीजसाठी चर्चेत असते. यापूर्वीही तिनं घातलेला लुईस विट्टन ब्रँडचा तब्बल 25 हजार रुपयांचा काळ्या रंगाचा मास्क (Mask) आणि अडीच लाख रुपयांची पर्स याचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या