JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: अक्षय कुमारच्या मुलीने आईसाठी गिटारवर कुठलं गाणं वाजवलं पाहा आणि त्यावरची ट्विंकलची प्रतिक्रियाही...

VIDEO: अक्षय कुमारच्या मुलीने आईसाठी गिटारवर कुठलं गाणं वाजवलं पाहा आणि त्यावरची ट्विंकलची प्रतिक्रियाही...

आई ट्विंकल खन्नाने मुलीच्या या गिटारवादनावर काय प्रतिक्रिया दिली आहे, तीही वाचाच. पाहा VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 8 फेब्रुवारी : बॉलिवूड अभिनेता (Bollywood actor) अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) यांची जोडी खूप प्रसिद्ध आहे. या दोघांची मुलगी (daughter) नितारा (Nitara) खूप हुशार आणि टॅलेंटेड आहे. नुकताच तिचा एक व्हिडिओ व्हायरल (video viral) झाला आहे. नितारा या व्हिडिओमध्ये लहान मुलांची कविता (kids rhyme) ‘ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार’ म्हणते आहे. आई आणि मुलगी बऱ्याचदा एकत्र क्वालिटी टाईम (quality time) घालवतना दिसतात. ट्विंकल खन्नानं इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केला आहे. ट्विंकलच्या या व्हिडिओवर असंख्य चाहते (fans) आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकांनी या व्हिडिओला भरभरून लाईक्स दिल्या आहेत. कौतुकासह चाहते निताराला खूप प्रेम देत आहेत. ट्विंकलनं व्हिडिओ शेअर करताना लिहिलं, की ‘हिनं माझ्यासाठी हे वाद्य वाजवलं. माझं नाव नर्सरी राईममध्ये येतं हे काय वाईट नाही.’

संबंधित बातम्या

ट्विंकल सोशल मीडियावर (social media) बरीच सक्रिय असते. ती चाहत्यांसह आपल्या खासगी आयुष्यातले अपडेट्स शेअर करत असते. अक्षय कुमार आणि ट्विंकलला दोन मुलं आहेत. आरव आणि नितारा. याआधी ट्विंकलनं एक व्हिडिओ शेअर केला होता. यात नितारा झोक्यावरून खाली उतरत होती. ट्विंकलनं अक्षय कुमारसोबत जानेवारी 2001 मध्ये लग्न (marriage) केलं होतं. ही इंडस्ट्रीमधली सर्वाधिक प्रसिद्ध जोडीपैकी एक आहे. दोघांच्या नात्याचं (relationship) उदाहरण अनेक लोक देत असतात. दोघांच्या लग्नाला आता वीस वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोघांची लव्हस्टोरी (love story) आगळीवेगळी आहे. अक्षयला पहिल्या नजरेतच ट्विंकलसोबत प्रेम (love) झालं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या