JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / बॉलिवूडला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आता 'कबीर सिंग'च्या अभिनेत्रीला झाली लागण

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा आणखी घट्ट; आता 'कबीर सिंग'च्या अभिनेत्रीला झाली लागण

Bollywood corona threat: एका पाठोपाठ एक बॉलिवूड कलाकार कोरोनाग्रस्त होत आहेत. आता ‘कबीर सिंग’(kabir singh) मध्ये झळकलेल्या अभिनेत्रीला कोरोनाची लागण झाली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 7 एप्रिल- गेल्या कित्येक दिवसांपासून बॉलीवूडमध्ये (bollywood)कोरोनाचा शिरकाव(corona) झाल्याचं दिसत आहे. चित्रीकरणाला(shooting) परवानगी मिळाल्यानंतर अनेक कलाकार कोरोनाच्या तडाख्यात सापडले आहेत. एका पाठीमागे एक कलाकारांना कोरोनाची लागण होतं आहे. आजही अशाच एका अभिनेत्रीला कोरोनाचा फटका बसला आहे. ‘कबीर सिंग’(kabir singh) मध्ये झळकलेली अभिनेत्री निकिता दत्ताला(nikita dutta) कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. निकितासोबत तिच्या आईला (nikitas mother)सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. निकिताने स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे.

संबंधित बातम्या

निकिता सध्या आपल्या आगामी ‘रॉकेट गँग’(rocket gang) या चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. या चित्रिकरणादरम्यान तिला कोरोनाची लागण झाली आहे. याबद्दल बोलताना निकितानं म्हटलं आहे की, हे खुपचं दुर्दैवी आणि दुखद आहे. आम्ही 2019 पासून या चित्रपटाचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र वर्षभर चालू असलेल्या कोरोनाच्या महामारीमुळे वारंवार आम्हाला चित्रीकरण रद्द करावं लागत आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु करण्यात आलं होतं, मात्र त्यावेळी बॉस्को यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर आदित्यला कोरोनाची लागण झाली. आणि आत्ता मलासुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. माझा अहवाल पॉजिटीव आल्यानंतर मी स्वतःला होम क्वारंटाईन करून घेतलं आहे. मला 10 दिवसानंतर परत कोरोनाची तपासणी करण्याचं सांगण्यात आलं आहे. (हे वाचा: कतरिना कैफही कोरोना पॉझिटिव्ह; रिपोर्ट मिळताच सर्वात आधी केलं एक काम ) निकिता म्हणते चित्रिकरणावेळी काही दृश्ये अशी असतात, ज्यामध्ये कलाकारांना अंतर ठेवणं कठीण असतं. यावेळी आम्हाला मास्कसुद्धा वापरता येत नाही. अशावेळी आमची पूर्ण जबाबदारी सेटवरील कर्मचाऱ्यांवर अवलंबून असते. ते लोक वारंवार सॅनिटायझर, स्वच्छता, टेंम्प्रेचर या सर्व गोष्टींची काळजी घेऊन सुद्धा कालकार कोरोनाच्या विळख्यात येत आहेत. निकिताच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर निकिता आगामी काळात ‘बिग बुल’(big bull) या चित्रपटात झळकणार आहे. यामध्ये अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत आहे. बिग बुल 8 एप्रिलला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या