JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / नेहा कक्करने शेअर केला लहाणपणीचा फोटो; देवीच्या जागरणात सुरू होता गाण्याचा सराव

नेहा कक्करने शेअर केला लहाणपणीचा फोटो; देवीच्या जागरणात सुरू होता गाण्याचा सराव

नेहाने आपल्या सोशल मीडियावर एक बालपणीचा फोटो पोस्ट केला(Neha’s Childhood Pic) आहे. यामध्ये ती आपला भाऊ आणि सिंगर टोनी कक्कर(Tony Kakkar) याच्या सोबत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 5 मे :  बॉलीवूडची फेमस सिंगर(Bollywood Famous Singer) नेहा कक्कर (Neha Kakkar) आपल्या मधुर आवाजाने सर्वांच्याच मनावर राज्य करते. तिच्या अंदाजाचे लाखो चाहते आहेत. नेहा आपल्या नटखट अदांनी सर्वांचीच लाडकी बनली आहे. ती सोशल मीडियावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते. सतत वेगवेगळ्या फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ती चाहत्यांचं संपर्कात असते. मात्र फार कमी लोकांना माहितीय की नेहानं बालपणी अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिलं आहे. नेहाच्या आजच्या यशामागे तिचे कठोर परिश्रम आहेत. नेहाने आपल्या सोशल मीडियावर एक बालपणीचा फोटो पोस्ट केला (Neha’s Childhood Pic)  आहे. यामध्ये ती आपला भाऊ आणि सिंगर टोनी कक्कर(Tony Kakkar) याच्या सोबत आहे. या फोटोवर अनेक कलाकार आणि चाहते भरभरून लाईक्स आणि कमेंट्स सुद्धा करत आहेत. नेहा कक्करने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो देवीच्या जागरण मधील आहे. ज्यामध्ये छोटीशी नेहा आपल्या हातात माईक घेऊन उभी असलेली दिसत आहे. नेहाला हा फोटो ओळखीच्या एका व्यक्तीकडून मिळाला आहे.

संबंधित बातम्या

नेहाने हा फोटो शेयर करत म्हटलं आहे, ‘तुम्ही यामध्ये पाहू शकता, मी किती लहान वयात गायला सुरु केलं होतं. इतकचं नव्हे तरतुम्ही या फोटोमध्ये टोनी कक्करला सुद्धा पाहू शकता. जो आईच्या समोर बसलेला आहे. तसेच माझे बाबासुद्धा बाजूला बसले आहेत. असं म्हणतात ना की ‘स्ट्रगल इज रियल…ही गोष्ट आमच्यावर पूर्णपणे लागू होते. वी आर प्रौड कक्कर फॅमिली’..अशा आशयाचं कॅप्शन नेहाने या फोटोला दिलं आहे. (हे वाचा:  लव्ह लग्न लोचा’ फेम अभिनेत्री रुचिता जाधव अडकली लग्नबंधनात…. पाहा PHOTO ) या फोटोसोबतचं नेहाने आणखीन एक फोटो शेयर केला आहे. आणि त्यासोबतच लिहिलं आहे. जेव्हा तुम्ही हा फोटो स्वाईप करून पुढे जाल, तेव्हा तुम्हाला माझा आत्ताचा फोटो दिसेल आणि यात मी त्या व्यक्तीसोबत आहे, ज्याने मला माझ्या आयुष्यातील तो सर्वात सुंदर फोटो दिला आहे. (हे वाचा:  आमिर खानच्या ‘अफेयर’ बद्दल सलमान खानचा मोठा खुलासा, पाहा VIDEO ) नेहाच्या या फोटोंवर चाहते आणि कलाकार मोठ्या प्रमाणात दाद देत आहेत. पती रोहनप्रीत सिंगने म्हटलं आहे,’ कक्कर फॅमिलीचा स्ट्रगल खुपचं प्रामाणिक आहे, खुपचं मोठा आहे. मला गर्व आहे. तर भाऊ टोनी कक्करने म्हटलेली ‘ये कहा आ गये हम’ ही गाण्याची ओळ फोटोला अगदी साजेशी आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या