जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आमिर खानच्या 'अफेअर'बद्दल सलमानचा मोठा खुलासा, पाहा VIDEO

आमिर खानच्या 'अफेअर'बद्दल सलमानचा मोठा खुलासा, पाहा VIDEO

आमिर खानच्या 'अफेअर'बद्दल सलमानचा मोठा खुलासा, पाहा VIDEO

(amir khan affair) आमिरने सलमान (salman khan) बरोबर ‘अंदाज अपना अपना’ (Andaz Apna Apna) या चित्रपटात काम केलं होतं. सलमानचा एक जुना VIDEO शेअर होतोय. आमिरच्या अफेअर्सबद्दल तो सांगतोय पाहा..

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 4 मे-  बॉलीवूडचे तीन खान (Bollywood khan’s) आजही चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहेत. आमिर खान (Aamir Khan), सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) हे तीन खान सतत सिनेमांबरोबर त्यांच्या पर्सनल आयुष्याबाबतही चर्चेत असतात. हे तीनही खान एकमेकांचे कट्टर स्पर्धक. कधी त्यांचं पटत नाही अशा बातम्या येतात, तर कधी त्यांच्या गाढ मैत्रीचे गोडवे गायले जातात. या तिघांमधील नातं पाहून चाहते बरेच कन्फ्युज होतात. सलमानचा एक जुना VIDEO यासाठीच पुन्हा एकदा VIRAL होत आहे. आमिर, सलमान, शाहरुख या तीन खानांना एकत्र आणणं म्हणजे महाकठीण काम आहे. त्यामुळे काही चित्रपट वगळता यांना एकत्र पाहिलं गेलं नाही. आमिरने सलमान सोबत ‘अंदाज अपना अपना’ (Andaz Apna Apna) या चित्रपटात काम केलं होतं. मात्र या सेटवर ते एकमेकांसोबत बोलत देखील नव्हते असं म्हटलं जातं. याच दरम्यान सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये सलमानला आमिर खानच्या अफेयर्स बद्दल विचारण्यात येतं, आणि सलमान त्याला मजेशीर उत्तर देतो. सलमानला विचारण्यात आलं होतं, ‘आमिर खानच्या अफेयर्स बद्दल ज्या अफवा चालू आहेत, त्यात काही तथ्य आहे का’, यावर सलमान खान म्हणतो ‘त्या अफवा आमिरच्या बाबतीत नाहीत, तर त्या माझ्या बाबतीत आहेत. आमिरची इमेज खूपचं क्लीन आहे. माहीत नाही तो हे सगळं तो कसं काय सांभाळतो. एकतर तो खूपचं देखणा आहे. त्यात तो विवाहित आहे. तो प्रत्येक वेळी एकचं म्हणत असतो मी माझ्या पत्नीवर खूप प्रेम करतो. आणि यामुळेच त्याचा बचाव होतो.'

जाहिरात

हा व्हिडीओ पाहूनच लक्षात येतं की तो खूपचं जुना आहे. त्यामध्ये सलमान खूपचं तरुण दिसत आहे. सध्याच्या तुलनेत सलमान यात खूपचं बारीक आणि लाजरा दिसत आहे. (हे वाचा:  नूतनचा बोल्ड मराठी अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या आईशी 20 वर्षं होता अबोला ) ‘अंदाज अपना अपना’ हा एक विनोदी चित्रपट आहे. यामध्ये सलमान आणि आमिर सोबतचं करिश्मा कपूर आणि रविना टंडन सुद्धा आहेत. या चित्रपटात सलमान आणि आमिर मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलं दाखवण्यात आली आहेत. ते दोघे रविना टंडन या श्रीमंत मुलीला पटवण्याच्या नादात असतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात