मुंबई, 23 एप्रिल : कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या स्ट्रेनने बॉलिवूडला विळखा घातला आहे. आता पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध संगीतकाराची जोडी नदीम-श्रवण यातील संगीत दिग्दर्शक श्रवण राठोड यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. श्रवण यांना दोन दिवसांपूर्वी गंभीर परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सोशल मीडियावर श्रवण यांच्या निधनाची बातमी दिली आहे. नदीम सैफी म्हणाले, माझा शानू निघून गेला श्रवण यांच्या निधनावर त्यांचे मित्र आणि संगीत दिग्दर्शक नदीम सैफी यांना मोठा धक्का बसला आहे. आम्ही एकत्रपणे अख्ख आयुष्य घालवलं. आम्ही आमचं यश आणि अपयश एकत्र पाहिलं आहे. आमच्यातील नातं कधीच तुटलं नाही, अशी भावना त्यांनी एका माध्यमाशी बोलताना व्यक्त केली. अत्यंसंस्कारासाठी मुलं आणि पत्नी होऊ शकले नाही सामील श्रवण राठोड यांच्याशिवाय त्यांची पत्नी आणि मुलगा संजीव राठो हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत. श्रवण यांची पत्नी आणि त्यांचा मुलगा अंत्यसंस्कारात सामील होऊ शकले नाही. श्रवण मुंबईत माहितीमधील एका रुग्णालयात दाखल होते. तेथे गुरुवारी 22 एप्रिल रोजी रात्री 9.30 मिनिटांची त्यांनी शेवटचा श्वास घेतला. हे ही वाचा - अभिनेते किशोर नांदलस्कर यांच्या निधनानंतर Birthday सेलिब्रेशनचा VIDEO व्हायरल नदीम आणि श्रवण यांच्या आपल्या करिअरदरम्यान अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्यांना चित्रपट आशिकी, राजा हिंदुस्तानी, साजन आणि दीवाना या चित्रपटांसाठी फिल्मफेअर बेस्ट म्युजिक डायरेक्टरच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.