JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / रणवीरला कंडोमच्या जाहिरातीत पाहून चढला होता वडीलांचा पारा; वाचा किस्सा

रणवीरला कंडोमच्या जाहिरातीत पाहून चढला होता वडीलांचा पारा; वाचा किस्सा

रणवीर सिंहने आपल्या करीयरच्या सुरुवातीपासूनचं आपल्या कुटुंबियांचं आपल्यासाठी असेलेलं महत्व अधोरेखित केलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जुलै-  बॉलिवूडचा अभिनेता (Bollywood)  रणवीर सिंगने (Ranvir Singh) प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. घरी कोणतीही अभिनयाची पार्श्वभूमी नसतानासुद्धा फक्त आपल्या अभिनयाच्या जोरावर त्याने हे स्टारडम मिळवलं आहे. मात्र सुरुवातीच्या काळात बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी रणवीरलासुद्धा संघर्ष करावा लागला होता. यासर्व परिस्थितीमध्ये त्याच्या कुटुंबियांनी त्याला विशेष आधार दिल्याचं रणवीर नेहमीच सांगतो. आणि खासकरून त्याच्या वडिलांचा वाटा यात मोठा असल्याचंदेखील त्यान कबूल केलं आहे. मात्र एकवेळ अशी होती की रणवीरच्या एका प्रोजेक्टबद्दल त्याचे वडील अजिबात आनंदी नव्हते. जाणून घेऊया काय होता तो किस्सा

संबंधित बातम्या

अभिनेता रणवीर सिंगने आपल्या करीयरच्या सुरुवातीपासूनचं आपल्या कुटुंबियांचं आपल्यासाठी असेलेलं महत्व अधोरेखित केलं आहे. त्याच्या कुटुंबियांनी आणि विशेष म्हणजे त्याच्या वडिलांनी त्याला प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये सहकार्य केल्याचं आणि हिम्मत दिल्याचं रणवीर सांगतो. मात्र एकवेळ अशीही होती, की रणवीरच्या वडिलांनी त्याच्या एका प्रोजेक्ट मध्ये खास रुची दाखवली नव्हती. कारण ती एक कंडोम कंपनीची जाहिरात होती. (हे वाचा: 16 वर्षानंतर झाला होता घटस्फोट; वाचा आमिर-रीनामध्ये का आला होता दुरावा   ) 2014 मध्ये एका मुलाखतीदरम्यान रणवीरनं असं म्हटलं होतं की, ‘ माझ्या वडिलांना वाटत होतं की मीसुद्धा इतर कलाकारांप्रमाणे जाहिरातींमध्ये काम करावं. त्यांनी मला म्हटलंदेखील होतं. इतर कलाकार जाहिरातींमधून पैसे कमावत आहेत. तूसुद्धा असं काहीतरी ट्राय कर. त्यावेळी मी त्यांना म्हटलं होतं योग्य वेळ आल्यानंतर मीदेखील असं काही करेन. (हे वाचा: VIDEO: माध्यमांसमोर KISS करत केलं होतं अवाक्; वाचा आमिर-किरणचा तो किस्सा ) पुढे काही दिवसांनी मला एक जाहिरात मिळालीसुद्धा. मात्र मी जेव्हा हे माझ्या वडिलांना सांगितल तेव्हा त्यांना फारसा आनंद नाही झाला. कारण ती एका कंडोम कंपनीची जाहिरात होती. त्यामुळे मला माझ्या वडिलांनी म्हटलं होतं, ‘मला अपेक्षा आहे की तुला नक्की माहिती आहे की तू हे काय करत आहेस’.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या