JOIN US
मराठी बातम्या / मनोरंजन / Sara Ali Khan आणि Vicky Kaushal च्या चाहत्यांना झटका! हा बिग बजेट सिनेमा बनणार नाही?

Sara Ali Khan आणि Vicky Kaushal च्या चाहत्यांना झटका! हा बिग बजेट सिनेमा बनणार नाही?

या सिनेमामध्ये विकी कौशलसह (Vicky Kaushal) सारा अली खान (Sara Ali Khan) मुख्य भूमिकेत दिसणार होती. मात्र सिनेमा बनण्यास सुरुवात होण्यापूर्वीच प्रोडक्शन बंद झाल्याचे वृत्त समोर येते आहे.

जाहिरात

Vicky Kaushal and Sara Ali Khan

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 29 ऑगस्ट: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) स्टारर ‘द इमोर्टल अश्वत्थामा’ (The Immortal Ashwatthama) बाबत गेल्या दोन वर्षांपासून चर्चा सुरू आहे. या बिग बजेट सिनेमाची तयारी देखील सुरू झाली होती. मात्र सुरुवातीला कोरोना व्हायरस पँडेमिकमुळे या सिनेमाचे प्री-प्रोडक्शन थांबले होते आणि आता सिनेमा होल्डवर ठेवण्यात आला आहे. या सिनेमाची चाहत्यांना प्रतीक्षा होती. या सिनेमामध्ये विकी कौशलसह सारा अली खान (Sara Ali Khan) मुख्य भूमिकेत दिसणार होती. मात्र हा सिनेमा बनण्यास सुरुवात होण्यापूर्वीच प्रोडक्शन बंद झाल्याचे वृत्त समोर येते आहे. अशी माहिती समोर आली आहे की सिनेमाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला (Ronnie Screwvala Films) यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे. बॉलिवूड हंगामाच्या अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांपासून ‘द इमोर्टल अश्वत्थामा’ ची तयारी सुरू होती. प्री-प्रोडक्शनवर खूप खर्च देखील झाला होता. अगदी मेकर्सनी Pre-Visualisation आणि व्हीएफएक्स टीमसह बैठक देखील केली होती. सारा आणि विकीला अॅक्शन दृश्यांचे ट्रेनिंग देण्यासाठी आंतरराष्ट्रीय यूनिट देखील बोलावण्यात आले होते. असे असूनही सिनेमा प्रोडक्शनच्या टप्प्यात पोहोचलेला नाही. हे वाचा- Armaan Kohli मुळे सुपरस्टार बनला शाहरुख! किंग खान ने स्वत: केला होता खुलासा मीडिया अहलावालानुसार, रॉनी स्क्रूवाला यांनी यावर 30 कोटी खर्च केले होत आणि ते एका झटक्यात वाया गेले आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’ चा दिग्दर्शक  आदित्य धार (Aditya Dhar Films) करणार होता. मात्र या सिनेमाच्या क्रिएटिव्ह गोष्टींबाबत आदित्य आणि रॉनी यांच्यात काही मतभेद झाले आहेत आणि त्यानंतर सिनेमा रोखण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे. असे देखील म्हटले जात आहेकी रॉनी स्क्रूवाला यांनी निश्चित केलेल्या बजेटच्या बाहेर हा सिनेमा जात होता.

संबंधित बातम्या

याआधी विकी कौशलने 11 जानेवारी रोजी या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलं होतं. काहीतरी वेगळं पाहायला मिळणार यामुळे विकीच्या चाहत्यांमध्ये उत्साह होता. मात्र आता हा सिनेमा तयारच होणार नसल्याच्या बातम्या समोर आल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या