नवी दिल्ली 11 जून : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन (Bollywood Actress Vidya Balan) सध्या तिच्या आगामी शेरनी (Sherni) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट 18 जूनला अमेझॉन प्राईम व्हिडिओवर (Amazon Prime Video) रिलीज होत आहे. विद्याने आपल्या फिल्मी करिअरमध्ये विविध भूमिका साकारत बॉलिवूडच्या स्टिरीओटाईप विचारसरणीला आव्हान दिले आहे. चित्रपटातील आपली भूमिका अतिशय समरस होऊन साकारणाऱ्या या अभिनेत्रीने अनेकदा आपला दमदार अभिनय प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. विद्या ही तिच्या प्रत्येक चित्रपटात जीव ओतून काम करते, अशी तिची प्रतिमा निर्माण झाली आहे. त्यामुळेच ‘द डर्टी पिक्चर’, ‘पा’, ‘कहानी’ सारखे चित्रपट तिच्या अभिनयाचे कौशल्य अधोरेखित करतात. आगामी शेरनी या चित्रपटात विद्या एक संवाद म्हणते `जंगल कितना ही घना क्यों न हो शेरनी अपना रास्ता खुद ढूँढती है`. हा संवाद विद्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याला (Personal And Professional Life) अगदी चपखल बसतो. कारण आपल्या कामाप्रतीची उत्कटता तिच्या व्यक्तिमत्वात दिसून येते. जी भूमिका साकारायची आहे, त्या भूमिकेशी समरस होताना ती प्रत्येक चित्रपटात दिसते. ‘नवनाथांची’ गाथा दिसणार छोट्या पडद्यावर; सोनी मराठीवर नव्या मालिकांची मेजवानी विद्या बालनने माध्यमांशी संवाद साधताना सांगितले, की मी स्टिरीओटाईप (Stereo type) मोडण्याचा प्रयत्न केलेला नाही. पण माझ्या आयुष्यातील अनुभवांवरुन आणि विशेषतः अभिनेत्री म्हणून मला जाणवलं की मी माझ्या मार्गात कोणताही अडथळा येऊ देणार नाही. मला जर कोणी अभिनेत्री म्हणून तू खूप बारीक आहेस, लठ्ठ आहेस, खूपच बोल्ड आहेस, बेशरम आहेस किंवा खूपच समजूतदार आहेस किंवा काहीही म्हणलं तरी मी आहे अशी आहे. मी स्वतःला बदलणार नाही, परंतु माझा मार्ग मी निवडते. विद्या पुढे म्हणते, की मी कामाबद्दल असलेल्या आवडीवर लक्ष केंद्रीत करते कारण मी स्वतःला बदलू शकत नाही. मी कोणतीही लीग तोडण्याचा प्रयत्न करीत नाही तर मी माझ्या विचारांनुसार भूमिका निवडते. एक अभिनेत्री म्हणून मी स्वतःच्या मार्गाने प्रगती करीत आहे. सुशांतवर रुसल्या होत्या ‘श्रीकृष्णा’च्या मुली, अभिनेत्याने अशी केली मनधरणी विद्या बालनने वयाच्या 16 व्या वर्षी टीव्ही सिरियल ‘हम पाँच’मधून अभिनयाचा प्रवास सुरु केला. विद्याने 2005 मध्ये परिणिता या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या व्यतिरिक्त भूलभुलैय्या, नो वन किल्ड जेसिका, द डर्टी पिक्चर, पा, कहानी, मिशन मंगल, तुम्हारी सुलू, शंकुतला देवी सारखे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करुन तिने प्रेक्षकांच्या मनावर नेहमीच अधिराज्य गाजवलं आहे. आता आगामी शेरनी या चित्रपटात ती फॉरेस्ट ऑफिसरची भूमिका साकारत आहे.