मुंबई, 20 जानेवारी : सिनेअभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leony) हिला आज देशासह सगळं जग ओळखतं ते तिच्या मादक सौंदर्यासह विविध चित्रपटांमधील अभिनयासाठी. मात्र आपलं बालपण (childhood) काही अत्यंत वाईट अनुभवांनी भरलेलं होतं असं सांगत तिनं भावनांना वाट करून दिली आहे. सनीनं नुकतीच ETimes ला एक मुलाखत दिली. त्यात तिनं या अनुभवांबाबत सविस्तर सांगितलं. ती सांगते, की तिला बुलिइंग(bullying) अर्थात टोकाचा छळ, डिवचणं, हेटाळणी यांचा सामना करावा. विशेष म्हणजे शाळेत सोबत शिकणाऱ्या मित्रमैत्रिणींनीच तिच्यासोबत हे सगळं केलं. तिच्यात शब्दात सांगायचं तर, ‘मी एक गोऱ्या कातडीची भारतीय (Indian) मुलगी होते. माझ्या त्वचेवर काळी लव होती. शिवाय मी कपडेसुद्धा अगदी व्यवस्थित, फॅशनेबल असे घालत नव्हते. जरा विचित्रच (weird dresses) दिसायचे मी त्यामुळं. माझ्यासोबत बुलिइंग व्हायची. आणि यात कुठली गंमत किंवा मजेचा भाव अजिबातच नसायचा. या सगळ्या अनुभवांचा प्रभाव आयुष्यभर माझ्यावर राहिला. आणि हे काही हवंहवंसं फिलिंग अजिबातच नव्हतं. अनेकदा आपला छळ झाला, की आपण एका चक्रात अडकतो. मग सोबत असणाऱ्यालाही तशीच वागणूक देत हे चक्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. मात्र आपण समंजस, परिपक्व बनत हे चक्र भेदण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच आपण एका चांगल्या, निरोगी समाजाचं निर्माण करू शकू. सनी लिऑनीनं बिग बॉस 5च्या (Big boss 5) माध्यमातून भारतात लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तिनं 2012 साली रिलीज झालेला सिनेमा जिस्म -2 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर सनी अनेकानेक हिट चित्रपटांमध्ये दिसली.