मुंबई, 21 जून- आज सर्वत्र आंतराष्ट्रीय योगा दिवस (International Yoga Day) साजरा केला जात आहे. यानिमित्ताने अनेक अभिनेत्री आपआपले योगा फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना फिटनेस गोल देत आहेत. बॉलिवूडची(Bollywood) चुलबुली अभिनेत्री आलिया भट्टने (Alia Bhatt) सुद्धा आपला खास योगा व्हिडीओ शेयर करत सर्वांना इन्सपायर केलं आहे. या व्हिडीओमध्ये आलिया एकापेक्षा एक योगा पोझ देताना दिसून येत आहे.
बॉलिवूडच्या अभिनेत्री फिट राहण्यासाठी नियमित व्यायाम करत असतात. कोणी कार्डीओ करतं, तर कोणी योगा. आज आंतरराष्ट्रीय योगा दिवसाच्या निमित्ताने बॉलिवूड अभिनेत्री आपले योगा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेयर करत आहेत. अभिनेत्री आलिया भट्टने सुद्धा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक सुंदर व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती अनेक कठीण योगा पोझ करत असताना दिसत आहे. आलियाचा हा व्हिडीओ सर्वांना इन्सपायर करत आहे. चाहत्यांना फिट राहण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. (हे वाचा: Yoga Day 2021: मराठी अभिनेत्रींचा फिटनेस फंडा; असं टिकवतात आपलं सौंदर्य ) अभिनेत्री आलिया भट्टसुद्धा चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी खुपचं जाडजूड होती. आलिया अगदी गोलूमोलू दिसत होती. मात्र बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी तिनं आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष केंद्रित केलं होतं. आणि काही महिन्यांतच तिनं बरचसं वजन कमी केल होतं. आत्ता आलिया सर्वात फिट अभिनेत्रीपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिच्या सौंदर्यासोबतचं तिच्या फिटनेसचं देखील नेहमीच कौतुक होतं. (हे वाचा: VIDEO: ड्रामा क्वीनचा हटके अंदाज; राखीने भररस्त्यात रिक्षावाल्या मामांना थिरकवलं ) आलियाने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द ईयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. पहिल्याच चित्रपटामुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली होती. यामध्ये आलियासोबत सह कलाकार म्हणून अभिनेता वरुण धवन आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा होते. त्यानंतर आलियाने हायवे, राझी, कलंक, बद्री की दुल्हनिया, गंगुबाई काठडीयावाडी अशा अनेक चित्रपटांत उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत.