VIDEO: ड्रामा क्वीनचा हटके अंदाज; राखीने भररस्त्यात रिक्षावाल्या मामांना थिरकवलं

VIDEO: ड्रामा क्वीनचा हटके अंदाज; राखीने भररस्त्यात रिक्षावाल्या मामांना थिरकवलं

नुकताच राखीचा एक नवा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका रिक्षाचालकाला चक्क डान्स स्टेप शिकवताना दिसून येत आहे.

  • Share this:

मुंबई, 21जून- बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीचं आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असते. राखी नेहमीचं असं काहीतरी करत असते, ज्यामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते. बऱ्याचवेळा ती आपल्या या स्टाईलमुळे ट्रोलदेखील होते. मात्र राखीला त्याचा काहीही फरक पडत नाही. राखीचा एक नवा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये राखी सावंत चक्क रस्त्यावर एका रिक्षाचालकाला डान्स करण्यास भाग पाडल्याचं दिसत आहे. इतकचं नव्हे तर ती स्वतः त्यांना डान्सच्या स्टेप शिकवत आहे.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

राखी सतत काही ना काही करून चर्चेत असते, त्यामुळे तिला ड्रामा क्वीन म्हटलं जातं. नुकताच राखीचा एक नवा व्हिडीओ जोरदार व्हायरल होतं आहे. या व्हिडीओमध्ये राखी एका रिक्षाचालकाला चक्क डान्स स्टेप शिकवताना दिसून येत आहे. यामध्ये ती आपल्या एका नव्या गाण्याच्या स्टेप त्यांना शिकवत आहे. फक्त शिकवतच नाहीय तर खूप एन्जॉय देखील करत आहे.

(हे वाचा: Yoga Day 2021: मराठी अभिनेत्रींचा फिटनेस फंडा; असं टिकवतात आपलं सौंदर्य  )

राखी अशा या आगळ्यावेगळ्या प्रकारांमुळे नेहमीच चर्चेचा विषय बनते. काही दिवसांपूर्वीच राखी बिग बॉस 14 मध्ये सहभागी झाली होती. त्यामध्ये सुद्द्धा ती अशाच आपल्या आगळ्यावेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत आली होती. बिग बॉसमध्ये ती मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांचं आणि घरातील स्पर्धकांचंदेखील मनोरंजन करत होती. यामध्ये ती रुबिना दिलैकचा पती आणि अभिनेता अभिनव शुक्लावर सुद्धा फिदा झाली होती. त्याचं लक्ष वेधण्यासाठी ती अनेक अशा गोष्टी करत होती, की ज्यामुळे रुबिना आणि तिच्यात वाददेखील झाले होते. मात्र हे सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी असल्याचं तिनं नंतर सांगितलं होतं. बिग बॉसमधून ती 14 लाखांची रक्कम घेऊन बाहेर पडली होती.

Published by: Aiman Desai
First published: June 21, 2021, 2:25 PM IST

ताज्या बातम्या