मुंबई, 22 जुलै: बॉलिवूड दिग्दर्शक (Bollywood Director) अनुराग कश्यपची (Anurag Kashyap Daughter) मुलगी आलिया कश्यप म**(Aaliyah** Kashyap) नेहमीच चर्चेत असते. आलियाने अजून बॉलिवूड एन्ट्री केलेली नाही. तरीसुद्धा ती एका अभिनेत्री इतकीच फेमस आहे. सोशल मीडियावरसुद्धा तिचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. ती सतत आपल्या बोल्ड पोस्टमुळे चर्चेत असते. तर दुसरीकडे आपल्या बॉयफ्रेंडमुळेही चर्चेत असते. आलिया नेहमीचं खुलेपणाने सोशल मीडियावर व्यक्त होतं असते. अलीकडेच आलियाने आपल्या वडिलांच्या म्हणजेच अनुराग कश्यप यांच्याशी संबंधित Me Too प्रकरणावर खुलेपणाने भाष्य केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आलियाने एका मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे, ‘जे लोक माझ्या वडिलांना ओळखतात. त्यांना माहिती आहे की ते एक टेडी बियर आहेत. Me Too च्या आरोपांनी मला अस्वस्थ केलं होतं. मी चिंतेत होते. कारण त्यांच्या व्यक्तिमत्वाला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात येत होतं. लोकांना वाटत की ते एक वाईट माणूस आहेत. मात्र माझ्या जवळ असणाऱ्या प्रत्येक माणसाला माहिती आहे की ते किती मऊ असे टेडी बियर आहेत’. (हे वाचा: डर्टी पिक्चरसाठी राजकडे होता प्लॅन बी, Hotshot बॅननंतर सिक्रेट अॅप होतं तयार ) आलिया पुढं म्हणते, ‘मला या सर्व गोष्टींचा तिरस्कार नव्हे तर काळजी वाटते. कारण त्यांचं व्यक्तिमत्व खराब केलं जातं आहे. मला असं वाटत की या लोकांना चांगलं करण्यासाठी असं काहीच नाहीय. त्यामुळे हे लोक असं काही करत आहेत. माझे बाबा या सर्व गोष्टींना आत्ता माझ्यापासून दूर ठेवतात. कारण त्यांना मला पुन्हा त्रास आणि टेन्शन द्यायचं नाही’. (हे वाचा: पती करतो पॉर्न आणि पत्नी योगा’; Hungama 2 मधील गाण्यामुळे शिल्पा शेट्टी ट्रोल ) नुकताच फादर्स डेच्या निमित्ताने आलियाने वडिलांसाठी एक खास ब्लॉग लिहिला होता. त्यामध्ये तिने आपल्या वडिलांना म्हणजेच अनुरागला विचारलं होतं, की जर मी प्रेग्नेंट झाले तर. यावर अनुरागने उत्तर दिलं होतं. ‘मी तुझ्या प्रत्येक गोष्टीत सोबत असेन. यासाठी खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. मात्र तरीसुद्धा मी तुझ्यासोबतचं राहीन’.