Home /News /entertainment /

‘पती करतो porn आणि पत्नी yoga’; Hungama 2 मधील गाण्यामुळे Shilpa Shetty troll

‘पती करतो porn आणि पत्नी yoga’; Hungama 2 मधील गाण्यामुळे Shilpa Shetty troll

शिल्पाच्या हंगामा 2 (Hungama 2) या आगामी चित्रपटाचं गाणं प्रदर्शित झालं. मात्र यावर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त तिला जोरदार ट्रोल केलं.

  मुंबई 22 जुलै: शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलीस सध्या या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. (Raj Kundra Pornograpgy case) मात्र यामुळे शिल्पा शेट्टीवर देखील जोरदार टीका केली जात आहे. नुकतेच शिल्पाच्या हंगामा 2 (Hungama 2) या आगामी चित्रपटाचं गाणं प्रदर्शित झालं. मात्र यावर काही नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त तिला जोरदार ट्रोल केलं. “पत्नी योगा करतेय अन् पती पॉर्न व्हिडीओंची निर्मिती करतोय” असं म्हणत तिची खिल्ली उडवली जात आहे.
  उमेश कामतच्या ऑफिसवर पोलिसांचा छापा; राज कुंद्रा विरोधात सापडला मोठा पुरावा  ‘हंगामा २’ मध्ये शिल्पा शेट्टी, परेश रावल आणि मीझान जाफरेसोबत प्रणिता सुभाषसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर आशुतोष राणा, मनोज जोशी, राजपाल यादव, जॉनी लीव्हर आणि टिकू तल्सानिया या चित्रपटात विनोदी रंगाची जोड देतील. हा चित्रपट २३ जुलैला हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्म प्रदर्शित होईल. राज कुंद्राबाबत ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का राज कुंद्राच्या पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे शिल्पा शेट्टीला मोठा झटका शिल्पा शेट्टीचा Super Dancer Chapter 4 चांगला गाजत आहे. याचं नाव सर्वाधिक लोकप्रिय मालिकांमधील यादीत घेतलं जातं.  दिग्ददर्शक अनुराग बासू, नृत्यदिग्दर्शक गीता कपूर आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा हे तीघे या डान्स रिअॅलिटी शोचे जज आहेत. मात्र मंगळवारी शिल्पा शेट्टी या शोच्या शूटसाठी आली नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याशिवाय पुढील काही शोमध्येही शिल्पा शेट्टी दिसणार नसल्याचं समोर आलं आहे. शिल्पा शेट्टीच्या जागी आता करिश्मा कपूर या डान्स रिअॅलिटी शोच्या जजची खुर्ची सांभाळणार आहे, अशी माहिती pinkvilla ने प्रसिद्ध केली आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Crime, Porn video, Raj kundra, Shilpa shetty

  पुढील बातम्या