• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • 'डर्टी पिक्चर'साठी राज कुंद्राकडे होता प्लॅन बी, Hotshot बॅन झाल्यानंतर सिक्रेट अ‍ॅप होतं तयार

'डर्टी पिक्चर'साठी राज कुंद्राकडे होता प्लॅन बी, Hotshot बॅन झाल्यानंतर सिक्रेट अ‍ॅप होतं तयार

अश्लील चित्रपट प्रसारित केल्यानं नियमांचं उल्लंघन केल्यामुळं गुगल प्ले स्टोअरकडून (Google Play) ‘हॉटशॉट’ (Hotshot) या ओटीटी अ‍ॅपवर (OTT App) बंदी घालण्यात आली.

  • Share this:
मुंबई, 22 जुलै: बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिचा पती राज कुंद्रा (Raj Kundra) याला अश्लील चित्रपट निर्मिती आणि प्रसारणाच्या अवैध धंद्यातील सहभागासाठी अटक करण्यात आली आहे. यानंतर बॉलिवूडमध्ये खळबळ माजली आहे. या धंद्याची बॉलिवूडमध्ये खोलवर पसरलेली पाळंमुळं आता उघड होत आहेत. या प्रकरणी अटकसत्र देखील सुरू झालं आहे. मालवणी पोलिस ठाण्यात 4 फेब्रुवारी रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात राज कुंद्रा हा मुख्य सूत्रधार असल्याचंही मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) स्पष्ट केलं आहे. राज कुंद्रा याला अश्लील चित्रपट (Porn Films) बनवण्यासाठी आणि काही अ‍ॅप्सद्वारे अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याच्या बेकायदेशीर उद्योगाच्या आरोपावरून सोमवारी रात्री मुंबई क्राइम ब्रँचनं (Mumbai Crime Branch) अटक केली. त्याला 23 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याची चौकशी करताना व्हॉट्सअ‍ॅपवरील (What’s App) कथित संभाषणांचे किमान चार स्क्रीनशॉट्स सापडले असून, यामध्ये कुंद्रा ‘एच अकाउंट’ ग्रुपच्या (H Account) दुसर्‍या सदस्यांबरोबर ‘प्लॅन बी’बाबत चर्चा करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. हे वाचा-राज कुंद्राबाबत ‘गंदी बात’ फेम अभिनेत्रीचा मोठा खुलासा; ऐकून बसेल धक्का अश्लील चित्रपट प्रसारित केल्यानं नियमांचं उल्लंघन केल्यामुळं गुगल प्ले स्टोअरकडून (Google Play) ‘हॉटशॉट’ (Hotshot) या ओटीटी अ‍ॅपवर (OTT App) बंदी घालण्यात आली. त्यामुळं एक नवीन अ‍ॅप सुरू करण्याची योजना राज कुंद्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आखली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राज कुंद्रा आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषणावरून ही बाब उघड झाल्याचं पोलीसांनी म्हटलं आहे. या गटातील एका सदस्यानं कुंद्रा याला व्हॉट्सअ‍ॅपवर गुगल प्लेनं हॉटशॉट या अ‍ॅपबद्दल पाठवलेल्या ईमेलचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. यावर राज कुंद्रा यानं त्याला रिप्लाय केला असून, त्यात ‘प्लॅन बी अंतर्गत किमान दोन-तीन आठवड्यात लाइव्ह आयओएस आणि अँड्रॉइडवर एक नवीन अ‍ॅप सुरू होईल, असं म्हटलं आहे. हे वाचा-''मला फोन करा, मी तुमच्यासाठी कपडे काढेन'', राजनं लीक केला होता माझा नंबर या संभाषणादरम्यान, तोपर्यंत आपण सर्व बोल्ड चित्रपट थांबवायचे का आणि प्ले स्टोअरवर पुन्हा अपील करायचे का? असा प्रश्न रॉब डिजिटल मार्केटिंग हॉटशॉट नावाच्या सदस्यानं कुंद्रा याला विचारला आहे. या सगळ्या संभाषणाचे पुरावे पोलिसांना मिळाले असून, हे सर्व रॅकेट उघडकीस आलं आहे. अनेक बड्या लोकांचा यात हात असण्याचीही चर्चा सुरू असून, बॉलिवूडचं बेगडी सत्य यामुळं उजेडात आलं आहे. यामुळं अनेक अभिनेत्रींनी आपलं लैंगिक शोषण झाल्याचीही तक्रार केली असून, सोशल मीडियावर सध्या महिला कलाकारांच्या लैंगिक शोषणाच्या अनेक प्रकरणांना वाचा फुटत असून, बॉलिवूडची काळी बाजू पुन्हा एकदा उघड होत आहे.
First published: